Violence In Haiti  Dainik Gomantak
ग्लोबल

Violence In Haiti: हैतीमध्ये भयानक हिंसाचार, 530 हून अधिक लोकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली चिंता

Haiti: कॅरेबियन देश हैतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराने आता रौद्र रुप धारण केले आहे. सध्या तिथे गॅंगवार वाढत आहे.

Manish Jadhav

Violence In Haiti: कॅरेबियन देश हैतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराने आता रौद्र रुप धारण केले आहे.

सध्या तिथे गॅंगवार वाढत आहे. या रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत शेकडो लोक मारले गेले आहेत. हैतीमध्ये हिंसाचार आणि झपाट्याने बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या दरम्यान,

मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाने सांगितले की, सामूहिक हिंसाचारात 530 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 15 मार्चपर्यंत, टोळींशी संबंधित घटनांमध्ये, प्रामुख्याने राजधानी पोर्ट-ऑ-प्रिन्समध्ये एकूण 531 लोक मारले गेले, तर 300 जखमी झाले आणि 277 जणांचे अपहरण झाले.

OHCHR ने हैतीमधील हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली

माहितीनुसार, हुर्टॅडो यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, OHCHR ने हैतीमध्ये होत असलेल्या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हैतीमध्ये नियंत्रणाबाहेर होत असलेल्या हिंसाचाराबद्दल आम्ही "खूप चिंतित" आहेत.

ते पुढे म्हणाले की, अधिक हिंसक आणि वारंवार होत आहेत, कारण ते प्रतिस्पर्ध्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना ठार मारतात. ते त्यांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतात.

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून ते 15 मार्चपर्यंत टोळीशी संबंधित घटनांमध्ये एकूण 531 लोक मारले गेले, 300 जखमी झाले आणि 277 जणांचे अपहरण झाले, असेही ते म्हणाले

मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यात टोळी संघर्षात 208 ठार

केवळ मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यात टोळ्यांमधील संघर्षात किमान 208 ठार, 164 जखमी आणि 101 जणांचे अपहरण झाले, असे OHCHR प्रवक्त्याने सांगितले.

बहुतेक बळी हे स्निपरद्वारे मारले गेले किंवा जखमी झाले, जे लोकांच्या घरांमध्ये किंवा रस्त्यावर अनियंत्रितपणे गोळीबार करत होते. महिला (Women) आणि मुलींवरील लैंगिक हिंसाचाराचा वापर

टोळ्यांद्वारे लोकसंख्येला दहशत, वश करण्यासाठी आणि शिक्षा देण्यासाठी देखील केला जातो. टोळीचे लोक अनेकदा अपहरण केलेल्या मुलींवर (Girls) लैंगिक हिंसाचार करुन कुटुंबांना खंडणीसाठी दबाव आणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT