Giorgia Meloni: पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या एका इटालियन नेत्याने युक्रेनियन महिलेवर बलात्कार होत असल्याचा व्हिडिओ शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे. मात्र, या वादात ट्विटरने हा व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटवला आहे. उजव्या विचारणीच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पुढील पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. त्यांनी सोमवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला होता.
दरम्यान, जॉर्जिया मेलोनी यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ अस्पष्ट होता. व्हिडिओमध्ये एक प्रवासी पुरुष युक्रेनियन महिलेवर बलात्कार करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, “लैंगिक हिंसाचाराच्या या भयंकर प्रसंगासमोर आम्ही शांत बसू शकत नाही.'' मात्र, लोकांना त्यांनी असे व्हिडिओ शेअर करणे टाळण्यास सांगितले आहे. तक्रारीनंतर ट्विटरने मेलोनी यांचे ट्विट हटवले आहे. या व्हिडिओसंबंधी कंटेन्ट यापूर्वी रविवारी रात्री उशिरा एका वृत्तपत्राच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला होता.
दुसरीकडे, मेलोनी यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी त्यांच्या ट्विटचा तीव्र निषेध केला आहे. लोकांनी मेलोनी यांच्यावर पीडितेच्या संमतीशिवाय व्हिडिओ पोस्ट करुन पीडितेच्या दुःखात भर घातल्याचा आरोप केला आहे. मंगळवारी सकाळी ही पोस्ट हटवण्यात आली. मात्र मेलोनी यांच्याकडून अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. याआधी सोमवारी मेलोनी यांनी ट्विट करत म्हटले होते की, "पीडित व्यक्तीशी सहानुभूती व्यक्त करण्यासाठी, घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळावा यासाठी आपण हा व्हिडिओ जारी केला आहे.''
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील पिआसेन्जा शहरातील 55 वर्षीय युक्रेनियन महिलेवर रविवारी पहाटे गिनी (West African Countries) येथून आलेल्या एका स्थलांतरिताने फुटपाथवर हल्ला केला. पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, चौकशी सुरु असून त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच, या घटनेचा व्हिडिओ त्या गल्लीसमोरील एका फ्लॅटमधून कोणीतरी बनवला. ऑनलाइन पोस्ट केलेले व्हिडिओ नंतर हटवण्यात आला, ज्यामुळे पीडितेची ओळख पटवणे अशक्य झाले. परंतु तिचे रडणे ऑडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत होते.
इटालियन अधिकार्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ कसा जारी झाला याचा तपास केला जात आहे. पिआसेन्झा फिर्यादी ग्राझिया प्राडेला म्हणाले, "गुन्हेगारी घटनेचे चित्रण करणारा व्हिडिओ मीडियापर्यंत पोहोचला की, नाही हे पाहण्यासाठी संपूर्ण तपास सुरु आहे."
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.