तुर्कीमध्ये प्रशिक्षण, रशियामध्ये नियोजन अन् टेलिग्रामवर चॅट...असा डीकोड केला IS चा 'प्लॅन इंडिया'

रशियाने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी भारतात आत्मघातकी हल्ला करण्यासाठी तयार केला होता.
terrorist
terrorist Dainik Gomantak
Published on
Updated on

रशियाने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी भारतात आत्मघातकी हल्ला करण्यासाठी तयार केला होता. अटक करण्यात आलेला दहशतवादी भारतातील सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या नेत्याला लक्ष्य करण्याचा कट रचत होता. (ISIS terrorist arrested in russia)

रशियाची सुरक्षा एजन्सी एफएसबीने सांगितले की, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे दहशतवादी संतापला होता. त्याने तुर्कीमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटांचे प्रशिक्षण घेतले होते. टेलीग्राम अॅपच्या माध्यमातून दहशतवादी त्याच्या मालकांशी बोलायचा. रशियामार्गे भारतात जाऊन आत्मघातकी हल्ला करण्याचा कट आखत असल्याची कबुली या दहशतवाद्याने दिली आहे.

terrorist
तुर्की सिनेमात रोबोट साकारणार मुख्य भूमिका

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव अजमोव माशाहोंट (Azamov Mashahont) आहे. ज्याचे वय 20 वर्षे आहे. हल्ल्याच्या तयारीसाठी तो भारतात कोणाला तरी भेटणार होता, असे दहशतवाद्याने सांगितले आहे. पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा दहशतवादी नाराज होता. आणि म्हणून त्याने भारताविरोधात कट रटला होता. दरम्यान, एनआयए आणि आयबीची टीमही मॉस्कोला जाऊन दहशतवाद्याची चौकशी करू शकते, मात्र, भारत सरकार अजूनही रशियन सरकारच्या संपर्कात असून पुरावे मिळण्याची वाट पाहत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

तुर्कीमध्ये आत्मघाती हल्ल्याचे प्रशिक्षण

रशियन वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अटक करण्यात आलेला दहशतवादी मध्य आशियाई भागातील एका देशाचा रहिवासी आहे. एफएसबीच्या म्हणण्यानुसार, या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान, इस्लामिक स्टेटने तुर्कीमध्ये आत्मघाती बॉम्बर म्हणून परदेशी नागरिकांची भरती केली. तुर्कीमध्येच त्याला आत्मघाती हल्ले करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. दहशतवादी टेलीग्राम मेसेंजरच्या माध्यमातून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला आणि नंतर इस्तंबूलमध्ये आयएसच्या दहशतवाद्यांना भेटला.

रशियातून भारतात येण्याचा प्रयत्न करत होता

एफएसबीने सांगितले की, अटक केलेल्या दहशतवाद्याने प्रशिक्षणानंतर IS नेत्याशी निष्ठेची शपथ घेतली होती. त्यानंतर तो रशियाला आला. रशियात तो आवश्यक कागदपत्रे बनवण्याचा प्रयत्न करत होता आणि नंतर भारतातही जात होता. दहशतवाद्याच्या चौकशीचा एक व्हिडिओही जारी करण्यात आला असून, त्यात त्याचा चेहरा अस्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दहशतवाद्याने सांगितले आहे की, एप्रिलमध्ये विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याने आयएस नेत्याशी निष्ठेची शपथ घेतली आणि त्यानंतर तो रशियाला आला. त्याने व्हिडिओमध्ये काही नियोजनाबाबत खुलासा केला आहे. त्याला भारतात दहशतवादी हल्ला करण्यासाठी काही आवश्यक साहित्यांची आवश्यकता होती. जेणेकरून तो पैगंबर मोहम्मदचा अपमान करणाऱ्यांचा बदला घेऊ शकेल.

terrorist
Google Doodle: अण्णा मणीच्या 104 व्या जयंतीनिमित्त Google बनवले खास डूडल

या प्रश्नांची उत्तरे मिळणं गरजेच

1. अटक केलेल्या दहशतवाद्याकडे भारताचा व्हिसा आहे का?

2. जर दहशतवादी दावा करत असेल की त्याला भारतातील एखाद्या व्यक्तीकडून स्फोटके आणि जीवनावश्यक वस्तू मिळणार होत्या, तर त्याचा फोन भारतात कोणाच्या संपर्कात होता हे सांगू शकतो का?

3. ते NIA च्या तपासाच्या कक्षेत येते का? कारण दहशतवाद्याने भारतात कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे रशियातील त्याचा कथित गुन्हा 'परदेशात भारतीय हितसंबंधांना हानी पोहोचवण्याच्या' कक्षेत येतो का?

जेव्हा या प्रश्नांची उत्तरे सापडतील, तेव्हाच NIA त्यात काही निर्णय घेतील. सध्या भारत रशियाच्या संपर्कात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काही नवीन स्लिप सेल किंवा मॉड्युल आहेत का हे शोधण्यासाठी, सध्या IS शी संबंधित भारतात अटक करण्यात आलेल्या लोकांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com