US healthcare system defrauded by Indian man, stole $2.8 million through fake invoices and signatures. Dainik Gomantak
ग्लोबल

भारतीय भामट्याने पोखरली अमेरिकेची आरोग्य व्यवस्था खोट्या पावत्या आणि स्वाक्षऱ्यांद्वारे लाटले 28 लाख डॉलर्स

आरोपीने बनावट नावे, स्वाक्षरी आणि ओळख लपवत बिलांच्या बदल्यात काहीही सेवा प्रदान न करता, मेडिकेअरकडून अंदाजे 28 लाख अमेरिक डॉलर इतकी रक्कम दोन महिन्यांत लाटली. त्यानंतर ही रक्कम मनी लॉन्ड्रिंगद्वारे भारतातील त्याच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली.

Ashutosh Masgaunde

US healthcare system defrauded by Indian man, stole $2.8 million through fake invoices and signatures:

अमेरिकेतील मिशिगनमध्ये एका भारतीय नागरिकाला 28 लाख डॉलरची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या भारतीय नागरिकावर आरोग्य सेवा गैरव्यवहार केल्याचा आणि फसवणूकीची रक्कम भारतातील विविध बँक खात्यांमध्ये मनी लॉन्ड्रिंगद्वारे वळवल्याचा आरोप आहे.

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, योगेश पांचोली (वय 43 वर्ष) अमेरिकेच्या मिशिगन राज्यात श्रिंग होम केअर इंक नावाची आरोग्य सेवा कंपनी चालवत होते, ज्याचे मालक देखील तेच आहेत.

मेडिकेअर बिलिंग सिस्टीमच्या बाहेर असूनही, आरोपीने बनावट नावे, स्वाक्षरी आणि ओळख लपवत बिलांच्या बदल्यात काहीही सेवा प्रदान न करता, मेडिकेअरकडून अंदाजे 28 लाख अमेरिक डॉलर इतकी रक्कम दोन महिन्यांत जमा केली. त्यानंतर पंचोलीने ही रक्कम मनी लॉन्ड्रिंगद्वारे भारतातील त्याच्या विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली.

योगेश पांचोलीवर खटला सुरू होण्याच्या एक दिवस आधी विविध फेडरल तपास यंत्रणांना बनावट ईमेल पाठवल्याचाही आरोप आहे. ज्यामध्ये सरकारी साक्षीदाराने अनेक गुन्हे केले असतील तर त्याला अमेरिकेत राहण्याची परवानगी नाही, असे लिहिले होते.

कारवाई टाळण्यासाठी योगेशने ही युक्ती खेळली. मात्र, तपासादरम्यान तो पकडला गेला. मिशिगनच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टमधील फेडरल ज्युरीने योगेश पांचोलीला लबाडी आणि कट रचल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. आता योगेशला 10 जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

योगेश पांचोलीला ओळख लपवल्याच्या आरोपाखाली दोन वर्षांचा तुरुंगवास, कट रचल्याच्या आणि खोटे ईमेल पाठवून तपासाची दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली किमान 20 वर्षांचा तुरुंगवास आणि आरोग्यसेवेतील गैरव्यवहाराच्या आरोपाखाली किमान 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात येऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT