Joe Biden & Shahbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan मधील अमेरिकन कर्मचाऱ्यांवर हल्ल्याची शक्यता, US दूतावासाकडून अलर्ट जारी

Joe Biden & Shahbaz Sharif: अमेरिकेने पाकिस्तानातील आपल्या कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

Joe Biden & Shahbaz Sharif: अमेरिकेने पाकिस्तानातील आपल्या कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अमेरिकन लोकांना पाकिस्तानमधील हॉटेल मॅरियटपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावासाने रविवारी 'संभाव्य हल्ल्या'च्या चिंतेने आपल्या कर्मचार्‍यांना मॅरियट हॉटेलपासून दूर राहण्यास सांगितले आहे. वास्तविक, इस्लामाबाद सध्या हाय अलर्टवर आहे. तिथे होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

दरम्यान, सुट्ट्यांमध्ये पाकिस्तानात (Pakistan) अमेरिकन लोकांवर हल्ले होण्याची शक्यता असल्याचे अमेरिकन सरकारने म्हटले आहे. काही लोक या हल्ल्याचा कट रचत आहेत. इस्लामाबादमध्ये, अमेरिकन दूतावासाने एक अलर्ट जारी केला, ज्यात आपल्या समुदायातील लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यास बंदी घातली आहे.

या ठिकाणांना भेट देण्यास मनाई आहे

दूतावासाने आपल्या कर्मचाऱ्यांना (Employees) सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक स्थळे या ठिकाणांना भेट देण्यासंदर्भात सतर्क केले आहे. यासोबतच गर्दीची ठिकाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दूतावासाने अमेरिकन लोकांना त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करुन योजना आखण्यास सांगितले आहे, त्यांचे ओळखपत्र त्यांच्याकडे ठेवावे आणि कायद्याचे पालन करावे.

दोन दिवसांपूर्वी, राजधानी इस्लामाबादमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात एक पोलिस शहीद झाला होता, तर सहा जण जखमी झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन दूतावासाने एक सूचना जारी केली आहे. इस्लामाबाद प्रशासनाने 15 दिवसांसाठी सर्व प्रकारचे मेळावे, निवडणूक कार्यक्रमांशी संबंधित क्रियाकलापांवर बंदी घातली आहे. यासोबतच शहरात पुढील 48 तासांसाठी हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

2008 मध्ये मॅरियटवर हल्ला झाला होता

2008 मध्ये, एका आत्मघाती बॉम्बरने पंचतारांकित हॉटेल मॅरियटच्या बाहेरील गेटमध्ये 600 किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक घुसवला, त्यानंतर मोठा स्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटांमध्ये 60 जणांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT