Pakistan: FATF च्या ग्रे लिस्टमधून पाकिस्तान बाहेर, 4 वर्षानंतर मोठा दिलासा

FATF Gray List: पाकिस्तानला FATF कडून मोठा दिलासा मिळाला आहे.
Shehbaz Sharif
Shehbaz SharifDainik Gomantak

Pakistan Out Of FATF Grey List: पाकिस्तानला शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला आहे. FATF ने पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून काढून टाकले आहे. यासंदर्भातील निवेदन शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले. FATF ने आपल्या निवेदनात पाकिस्तानने मनी लाँड्रिंग, आर्थिक दहशतवादाचा सामना करण्यासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे स्वागत केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानने मनी लाँड्रिंगविरुद्ध प्रयत्नांना बळ दिले आहे. दहशतवादाला वित्तपुरवठा करण्याविरुद्ध पाकिस्तानने लढा दिला असून तांत्रिक त्रुटी दूर केल्या आहेत.

पाकिस्तानवर बंदी का घालण्यात आली

मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा पाकिस्तानवर (Pakistan) आरोप होता. यानंतर 2008 मध्ये फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (FATF) पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले होते. तब्बल चार वर्षांनंतर आता FATF ने पाकिस्तानला दिलासा दिला आहे.

Shehbaz Sharif
FATF Meeting: 'एफएटीएफ'च्या ग्रे यादीतून पाकिस्तान बाहेर पडणार?

2018 पासून पाकिस्तान या यादीत होता

FATF ने म्हटले की, पाकिस्तानने मनी लाँड्रिंग (Money laundering) विरोधात मोठे काम केले आहे. दहशतवादासाठी दिल्या जाणाऱ्या निधीविरोधात पाकिस्तान लढत आहे. तसेच पाकिस्तानने तांत्रिक त्रुटी देखील दूर केल्या आहेत. 2018 पासून पाकिस्तान FATF च्या ग्रे लिस्टमध्ये आहे. मनी लाँडरिंग, अँटी मनी लाँडरिंग आणि दहशतवादविरोधी वित्तपुरवठा प्रणाली सुधारण्यासाठी पाकिस्तान एशिया पॅसिफिक ग्रुपसोबत काम करत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Shehbaz Sharif
Global Hunger Index 2022: पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळने पुन्हा भारताला टाकले मागे

त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली

ग्रे लिस्टमध्ये असल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या होत्या. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा जागतिक बँकेकडून आर्थिक मदत घेऊ शकत नव्हता. एवढेच नव्हे तर आशियाई विकास बँक आणि युरोपियन युनियनकडूनही (European Union) आर्थिक मदत मिळणे त्यांना कठीण जात होते. अशा परिस्थितीत ग्रे लिस्टमधून काढून टाकण्याचा एफएटीएफचा निर्णय पाकिस्तानसाठी खूपच अनुकूल ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com