Work Permit Dainik Gomantak
ग्लोबल

बायडन प्रशासनाचा मोठा निर्णय, वर्क परमिटचा वाढवला कालावधी

बायडन प्रशासनाने (Biden Administration) स्थलांतरितांच्या काही श्रेणींसाठी वर्क परमिटची अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

बायडन प्रशासनाने स्थलांतरितांच्या काही श्रेणींसाठी वर्क परमिटची अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये एच-1बी व्हिसा धारकांच्या जोडीदारांना आणि ज्यांच्याकडे ग्रीन कार्ड आहे आणि ज्यांनी दीड वर्षांसाठी एम्प्लॉयमेंट ऑथोरायझेशन कार्ड ( EAD) मिळवले आहे, त्यांना याचा लाभ मिळणार आहे. होमलँड सिक्युरिटी विभागाने मंगळवारी ही घोषणा केली. बायडन प्रशासनाच्या (Biden Administration) या निर्णयामुळे हजारो भारतीय प्रवासींना फायदा होण्याची शक्यता आहे. (US extends work permit for immigrants by 1.5 years benefits Indians)

डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने (Department of Homeland Security) सांगितले की, सध्या EAD वर नमूद केलेल्या कालबाह्य तारखेपासून 180 दिवसांचा कालावधी 540 दिवसांपर्यंत वाढवला जाईल.

यूएससीआयएसचे संचालक उर एम. जद्दौ म्हणाले, "यूएससीआयएस (US Citizenship and Immigration Services) प्रलंबित ईएडी केसलोडचे निराकरण करण्यासाठी कार्य करते. सध्याचा 180 दिवसांचा कालावधी सध्यासाठी अपुरा आहे."

भारतीय-अमेरिकन समुदायाचे नेते अजय जैन भुटोरिया यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ''या बदलामुळे सुमारे 87,000 स्थलांतरितांना थेट फायदा होणार आहे. ज्यांच्या कामाची अधिकृत कालबध्दता संपली किंवा पुढील 30 दिवसांत नियोजित आहे, त्यांच्यासाठी बायडन प्रशासनाने दिलासा दिला आहे. एकूणच, सरकारचा (Government) अंदाज आहे की, वर्क परमिट नूतनीकरण करणार्‍या 420,000 स्थलांतरितांना फायदा होणार आहे.''

ते पुढे म्हणाले की, 'या धोरणातील बदलांमुळे नियोक्ते त्यांच्या कामगारांना आणि पात्र स्थलांतरितांना कालबाह्य झालेल्या कागदपत्रांवर 180 दिवसांऐवजी 540 दिवस राहू देऊ शकतात.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT