रशिया-युक्रेन युद्ध : पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटणार अमेरिकी राष्ट्रपती जो बायडन यांना

टोकियो येथील शिखर परिषदेवेळी करणार चर्चा
joe biden Narendra Modi
joe biden Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतंच रशिया विरुद्ध जगातील कोणता ही देश युक्रेनला मदत करु पाहत असेल तर ते रशिया कधी ही खपवून घेणार नाही. अन्यथा अशा राष्ट्रांवर रशिया हल्ला करेल असं धाडसी वक्तव्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांना रशिया-युक्रेन प्रश्नावर भेटणार आहेत. (Prime Minister Narendra Modi will meet US President Joe Biden )

joe biden Narendra Modi
रशिया-युक्रेन युद्धात हस्तक्षेप खपवून घेणार नाही - व्लादिमीर पुतिन

अमेरिकन राष्ट्रपती जो बाइडेन पुढच्याच महिन्यात टोकियो येथे एका शिखर परिषदेला हजेरी लावणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बायडन यांना भेटून रशिया-युक्रेन प्रश्नावर चर्चा करणार आहेत. व्हाइट हाउसने याबाबत दिलेल्या माहिती देत असे म्हटले आहे कि, बाईडन हे पुढील महिन्यात दक्षिण कोरिया आणि जापान दौरा करणार आहेत. यावेळीच ते क्वाडच्या शिखर परिषदेस हजेरी लावणार आहेत. यावेळीच बाइडेन भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत.

joe biden Narendra Modi
Ukraine war: "नरसंहार", रशियन हल्ल्याचा कॅनडा खासदारांनी केला निषेध

व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, बिडेन यांच्या भेटीमुळे बिडेन-हॅरिस प्रशासनाची मुक्त आणि मुक्त इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी ठोस वचनबद्धता पुढे येईल. या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल आणि जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.

मोदी-बायडन यांच्यात झाली व्हर्चुअल बैठक

यापूर्वी रशिया-युक्रेन संघर्षाबाबत पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची व्हर्चुअल बैठक झाली होती. या बैठकीत जागतिक संकट, कोविड महामारी आणि हवामान संकटावर चिंता व्यक्त करण्यात आली. या बैठकीत पीएम मोदींनी रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख करत बुका हत्याकांडाचा निषेधही केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com