fauchi.jpg 
ग्लोबल

'डेल्टा' मुळे कोरोनाचा नाश करण्याच्या अमेरिकेचा प्रयत्नांना अपयश

गोमंन्तक वृत्तसेवा

जगभरात आता 'डेल्टा' (Delta) या कोरोनाच्या अत्यंत संसर्गजन्य प्रकारामुळे कोरोनाचा नाश करण्याच्या अमेरिकेच्या (America) प्रयत्नांना मोठे अपयश आले असल्याचा इशारा व्हाइट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अ‍ॅन्थनी फौची (Anthony fauci) यांनी दिला आहे. डेल्टा हा कोरोनाचा प्रकार पहिल्यांदा भारतात (india) आढळला असून अमेरिकेतील 20 टक्क्यांहून अधिक जणांना त्याची लागण झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी हे प्रमाण केवळ 10 टक्के एवढेच होते, असेही डॉ. फौची यांनी मंगळवारी कोरोना स्थितीच्या आढाव्यासंबंधी माहिती देताना स्पष्ट केले.

तसेच ब्रिटनमध्ये (Britain) सध्या हीच परिस्थिती असून डेल्टा प्रकारामुळे अमेरिकेच्या कोरोना समूळपणे नाश करण्याचा प्रयत्नांना मोठा झाला आहे. तथापि अमेरिकेमधील कोरोना लसी डेल्टा प्रकाराविरुध्द परिणामकारक आहेत ही मात्र आनंदाची बाब आहे, असेही फौची यांनी यावेळी माध्यमाशी बोलताना सांगितले. (US efforts to destroy corona due to Delta fail)

डेल्टाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे प्रभावी हत्यार आहे, त्यामुळे त्याचा वापर करा आणि डेल्टाच्या प्रादुर्भावाला संपवून टाका, असेही ते यावेळी म्हणाले. ब्रिटनमध्ये डेल्टा या प्रकारने सध्या अल्फा (Alpha) या कोरोनाच्या दुसऱ्या प्रकारालाही मागे सोडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT