US destroys military equipment before leaving Kabul Dainik Gomantak
ग्लोबल

काबूल सोडण्यापुर्वी अमेरिकेनं नष्ट केली लष्करी सामूग्री

US च्या लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार लष्कराने काबूल विमानतळावरील हाय-टेक रॉकेट डिफेन्स सिस्टीमही बंद केली आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकन (American) लष्कराचे अफगाणिस्तानातील 20 वर्षांचे लष्करी ऑपरेशन ( ) अखेर संपले. मंगळवारी काबूल विमानतळावरून शेवटचा अमेरिकन सैनिक निघण्यापूर्वी, अमेरिकन लष्कराने त्याच्या ताब्यात असलेली सर्व लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर (Military Aircraft) आणि सशस्त्र वाहने (Armored Vehicles) नष्ट करुन टाकली. जेणेकरुन ही संसाधनं तालिबान्यांच्या हातात पडून तालिबान्यांकडून त्यांचा गैरवापर होऊ नये. 15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत अमेरिकन सैन्याने हे काम आपल्या नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानातून बाहेर काढत हे काम केले आहे.

अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार लष्कराने काबूल विमानतळावरील हाय-टेक रॉकेट डिफेन्स सिस्टीमही बंद केली आहे. सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनेथ मॅकेन्झी म्हणाले की, हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 73 विमाने आधीच डिमीलीट्राईज्ड करण्यात आली आहेत. म्हणजेच या विमानांच्या कोणत्याही लष्करी कार्यात वापर करता येणार नाहीये.

अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तब्बल 15 दिवसांत अमेरिकेने अफगाणिस्तानातून सुमारे 1.25 दशलक्ष लोकांना बाहेर काढले आहे. तसेच लष्करी विमानं नष्ट केल्यानंतर ही विमानं कधीही हवेत दिसणार नाही असं सांगितलं आहे.

मॅकेन्झी म्हणाले की, पेंटागॉनने काबुल विमानतळाच्या ऑपरेशनसाठी सुमारे 6,000 सैनिकांची फौज तयार केली होती आणि याद्वारे 14 ऑगस्ट रोजी अमेरिकन नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात झाली होती. त्यांनी उघड केले की, अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमध्ये 70 एम.आर.ए.पी. लष्करी वाहनं अफगाणिस्तानमध्ये सोडली आहेत. या प्रत्येक वाहनाची किंमत 1 दशलक्ष डॉलर एवढी आहे. यासह, 27 Humvees देखील तेथे सोडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

SCROLL FOR NEXT