H-1B Visa Dainik Gomantak
ग्लोबल

H-1B Visa: H-1B व्हिसावर अमेरिकन कोर्टाचा मोठा आदेश, भारतीयांना होणार फायदा!

US News: अमेरिकेचे जिल्हा दंडाधिकारी तान्या चटकन यांनी 'सेव्ह जॉब्स यूएसए'ने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

Manish Jadhav

H-1B Visa: अमेरिकी टेक्नोलॉजी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देताना एका न्यायमूर्तींनी एच-1बी व्हिसाधारकांच्या जोडीदाराला यूएसमध्ये काम करता येईल असा निर्णय दिला आहे.

अमेरिकेचे जिल्हा दंडाधिकारी तान्या चटकन यांनी 'सेव्ह जॉब्स यूएसए'ने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली, ज्यामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळातील हे नियमन रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती.

काय होते नियमन?

या नियमानुसार, H-1B व्हिसा धारकांच्या विशिष्ट श्रेणीतील जोडीदारांना रोजगार प्राधिकरण कार्ड दिले जाते. दुसरीकडे मात्र, अ‍ॅमेझॉन (Amazon), अ‍ॅपल, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या आयटी कंपन्यांनी या खटल्याला विरोध केला.

या नियमानुसार, यूएसने आतापर्यंत सुमारे 100,000 H-1B कर्मचाऱ्यांच्या जोडीदारांना कामाचे अधिकार दिले आहेत, ज्यात मोठ्या संख्येने भारतीय आहेत.

काय म्हणाले न्यायाधीश आदेशात?

न्यायमूर्ती तान्या चटकन यांनी आपल्या आदेशात सांगितले की, 'सेव्ह जॉब्स यूएसए'चा पहिला युक्तिवाद असा आहे की, काँग्रेसने होमलँड सिक्युरिटी विभागाला कधीही एच-4 व्हिसा धारकांसारख्या परदेशी नागरिकांना अमेरिकेत (America) राहून काम करण्याची परवानगी दिली नाही.

भारतीय अमेरिकन समुदायाचा प्रतिसाद

भारतीय-अमेरिकन समुदायाचे प्रमुख नेते आणि आयोगाचे सदस्य अजय जैन भुटोरिया यांनी या निर्णयाचे स्वागत केले. एच-1बी व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकन कंपन्या परदेशी कामगारांना विशेषतः टेक्नोलॉजी सेक्टरमध्ये नियुक्त करतात.

H-1B व्हिसा कार्यक्रम कुशल परदेशी कामगारांना युनायटेड स्टेट्समध्ये येऊन अमेरिकन कंपन्यांसाठी काम करण्याची परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. तथापि, अलीकडे पर्यंत, H-1B पार्टनर्संना काम करण्याची परवानगी नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घरवापसी करण्यास तयार! माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर 'भाजप'कडून प्रस्तावाच्या प्रतीक्षेत

Goa Cruise Tourism: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगामाची धमाकेदार सुरुवात, 'कॉर्डेलिया एम्प्रेस' 1,050 प्रवाशांसह दाखल

Viral Video: जो खिलाफ है मेरे मैं उनके विरुद्ध तो नही, पर हाँ... प्रदर्शन करणाऱ्या महिलेसमोर उभा ठाकला तिचाच पोलिस पती; पाहा सुंदर व्हिडिओ

North Goa: सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांची खैर नाही! 66 जण ताब्यात; उत्तर गोव्यात पोलिसांची मोठी कारवाई

Viral Video: प्रवाशांच्या जीवाशी खेळ! एसी डब्यात सिगारेट ओढणाऱ्या तरुणीचा हंगामा; प्रवाशांनी विरोध करताच सुरु झाली बाचाबाची

SCROLL FOR NEXT