Stewart Rhodes  Dainik Gomantak
ग्लोबल

US Capital Riot: यूएस कॅपिटलवर हल्ला !ओथ कीपर्स संस्थापक स्टीवर्ट रोड्सला 18 वर्षांची शिक्षा

US Capital Riot: अमेरिकेतील ओथ कीपर्सचे संस्थापक स्टीवर्ट रोड्स याला देशद्रोहाच्या गुन्ह्यात गुरुवारी 18 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Manish Jadhav

US Capital Riot: अमेरिकेतील ओथ कीपर्सचे संस्थापक स्टीवर्ट रोड्स याला देशद्रोहाच्या गुन्ह्यात गुरुवारी 18 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर जो बायडन यांच्या विरोधात यूएस कॅपिटलवर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप रोड्सवर होता.

6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या हल्ल्यातील तो पहिला आरोपी आहे, ज्याला देशद्रोह आणि कट रचल्याबद्दल शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजधानीतील दंगलीच्या सर्व प्रकरणांमध्ये त्याची शिक्षा ही आतापर्यंतची सर्वात मोठी शिक्षा आहे.

दरम्यान, सरकारी वकिलांनी 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे (Court) केली होती.

दरम्यान, मिलिशियाच्या फ्लोरिडा चॅप्टरच्या नेत्या केली मेग्सला 12 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. ऱ्होड्स आणि मेग्स यांना अधिकृत कार्यवाहीत अडथळा आणणे आणि कागदपत्रांशी छेडछाड केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.

माजी स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी फाशीची धमकी दिली

गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान रोड्सने थोडा पश्चाताप दाखवला. पण लगेच त्याने आपण राजकीय कैदी असल्याचा दावा केला. त्याचवेळी सत्तेत असलेले लोक आपल्या देशाला उद्ध्वस्त करत आहेत, मी त्यांच्या विरोधात उभा आहे, असा टोलाही त्याने लगावला.

यादरम्यान न्यायाधीश अमित मेहता यांनी त्याचे हे दावे फेटाळून लावले. ऱ्होड्सच्या हिंसक वक्तव्याबद्दल त्यांनी चिंताही व्यक्त केली, ज्यात यूएस हाऊसच्या माजी अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांना फाशी देण्याच्या धमक्यांचा समावेश आहे.

डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोड्सची शिक्षा दंगलप्रकरणी आतापर्यंत देण्यात आलेली सर्वात मोठी शिक्षा आहे. खरे तर, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या हजारो समर्थकांनी 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालांवर आक्षेप घेत यूएस कॅपिटल हिल्सवर हल्ला केला होता.

या प्रकरणी सरकारी वकिलांनी रोड्सला 25 वर्षे आणि मेग्सला 21 वर्षांच्या तुरुंगवासाची मागणी केली होती. त्याचवेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी प्रत्येकी तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षेसाठी अपील केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT