Donald Trump यांच्या अडचणी वाढल्या, आणखी एका महिलेने केला लैंगिक छळाचा आरोप!

US News: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आणखी एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
Donald Trump
Donald TrumpDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

US News: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आणखी एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. जेसिका लीड्स, 81, यांनी न्यूयॉर्कमधील ज्यूरीसमोर साक्ष दिली की, ट्रम्प यांनी 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात विमानात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.

दरम्यान, ई. जीन कार्लेस नावाच्या महिलेच्या वतीने ट्रम्प यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान लीड्स यांनी ही साक्ष दिली. मॅनहॅटनमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये माजी राष्ट्राध्यक्षांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा कार्ल्सने केला आहे.

Donald Trump
Donald Trump Case: डोनाल्ड ट्रम्प यांची पॉर्न स्टार प्रकरणी सुटका

दुसरीकडे, लीड्सने नॉर्थ कॅरोलिनाच्या ज्युरीसमोर साक्ष दिली की, न्यूयॉर्क सिटीकडे जाणाऱ्या विमानात मी आणि ट्रम्प एकमेकांच्या शेजारी बसलो होतो. लीड्सच्या म्हणण्यानुसार, काही सेकंदांनंतर, तिने 'आपल्याला याची गरज नाही' असे सांगून ट्रम्प यांच्या तावडीतून स्वतःला सोडवले आणि नंतर ती मागच्या सीटवर जावून बसले.

ट्रम्प यांनी पूर्ण प्रयत्न केला

लीड्स पुढे म्हणाली की, “आमच्यामध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. मी पूर्णपणे आश्चर्यकारक होते.” तिने पुढे आरोप केला की, “ट्रम्प माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न करत होते, मला त्यांच्याकडे खेचत होते. ते याहूनही अश्लील कृत्ये करत होते. जणू त्यांच्याकडे असंख्य हातांचे बळ आहे. जणू काही आम्हा दोघांमध्ये संघर्ष सुरु आहे.''

Donald Trump
Donald Trump in Porn Star Case: डोनाल्ड ट्रम्प यांना पॉर्न स्टार प्रकरणी अटक, समर्थकांचा न्यायालयाला घेराव

दुसरी महिला साक्ष देण्याची शक्यता आहे

या प्रकरणात ट्रम्प यांच्याविरोधात आणखी एक महिलाही साक्ष देण्याची शक्यता आहे. तथापि, ट्रम्प यांनी सातत्याने महिलांनी (Women) त्यांच्यावर केलेले लैंगिक अत्याचार आणि लैंगिक गैरवर्तनाचे आरोप फेटाळले आहेत.

हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी होऊ नये म्हणून आपली प्रतिमा डागाळण्याचे षडयंत्र असल्याचा दावाही त्यांनी केला.

ट्रम्प यांनी काही प्रश्नांची उत्तरे देण्याचे ठरवले

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या वकिलाने ज्युरीला सांगितले की, माजी राष्ट्राध्यक्षांनी या खटल्याशी संबंधित काही प्रमुख प्रश्नांची उत्तरे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आपली भूमिका मांडली आहे, ज्याचे काही भाग ज्यूरीसमोर ऐकले जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

US Sanctions On International Criminal Court
Susan Dell White House Appearance With Donald Trump
Donald Trump Statement on France Protest
Donald Trump Claims Iran Behind Plane Attack
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com