Donald Trump in Porn Star Case: डोनाल्ड ट्रम्प यांना पॉर्न स्टार प्रकरणी अटक, समर्थकांचा न्यायालयाला घेराव

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमधील न्यायालयात हजर होण्यापूर्वी मंगळवारी रात्री त्यांची अटक करण्यात आली.
Donald Trump and Stormy Daniels scandal
Donald Trump and Stormy Daniels scandalDainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump under arrest in Porn Star Case: पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर आणि तिला अवाजवी फायदा मिळवून दिल्याबद्दल खटल्याला सामोरे जाणाऱ्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे.

न्यूयॉर्कमधील न्यायालयात हजर होण्यापूर्वी मंगळवारी रात्री त्यांची अटक करण्यात आली. मॅनहॅटन कोर्टाबाहेर ट्रम्प यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमले आहेत. दुसरीकडे, हिंसाचाराची शक्यता लक्षात घेता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

शिक्षेवर लवकरच सुनावणी होणार आहे

अटकेनंतर ट्रम्प यांच्या वकिलांनी त्यांना हातकडी न घालण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी काही वेळात कोर्टात शिक्षेवर सुनावणी होणार आहे.

असा आरोप आहे की, 2016 मध्ये ट्रम्प यांच्या टीमने पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासोबतच्या अफेअरशी संबंधित मुद्द्यावर मौन बाळगण्यासाठी USD 1,30,000 दिले होते. हे पेमेंट ट्रम्प यांचे वकील मायकेल कोहेन यांनी केले होते.

Donald Trump and Stormy Daniels scandal
Donald Trump return on Twitter: डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवर कम बॅक, एलन मस्कचे ट्विट पुन्हा चर्चेत

पॉर्न स्टारच्या खुलाशांमुळे भूकंप झाला होता

पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या मते, डोनाल्ड ट्रम्पसोबत तिची पहिली भेट 2006 मध्ये गोल्फ स्पर्धेदरम्यान झाली होती. डॅ

नियल्सचा दावा आहे की, पहिल्याच भेटीत ट्रम्प यांनी तिला डिनरसाठी आमंत्रित केले होते. या भेटीबाबतच डॅनियल्सने दावा केला की, ट्रम्प यांनी त्या दिवशी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, जेव्हा ती त्यासाठी तयार नव्हती.

ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळले असले तरी. पण यानंतर ट्रम्प यांनी डॅनियल्सवर खंडणीचा आरोप केला आणि 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांनी डॅनियल्सला गप्प बसण्यासाठी 1 कोटी रुपये दिले होते. हा मुद्दा मॅनहॅटन कोर्टाने कायद्याचे उल्लंघन म्हणून घेतला होता.

Donald Trump and Stormy Daniels scandal
Donald Trump: 2024 ची राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढविण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, पण...

ट्रम्प यांचे राजकीय भविष्य काय असेल?

डोनाल्ड ट्रम्प आता पूर्णपणे कायदेशीर अडचणीत अडकले आहेत. अमेरिकेसह (America) संपूर्ण जगाच्या नजरा मॅनहॅटन कोर्टावर खिळल्या आहेत, कारण ट्रम्प यांच्या विरोधात निर्णय आल्यास त्यांच्या राजकीय भवितव्यावरही प्रश्न निर्माण होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com