Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

Donald Trump Cancels US Airstrikes Yemen Houthis: सौदी अरेबिया आणि हूती बंडखोर यांच्यातील तणावाने मध्य पूर्वेतील वातावरण चांगलेच तापले.

Manish Jadhav

Donald Trump Cancels US Airstrikes Yemen Houthis: सौदी अरेबिया आणि हूती बंडखोर यांच्यातील तणावाने मध्य पूर्वेतील वातावरण चांगलेच तापले. ताज्या अहवालानुसार, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या आवाहनानंतर अमेरिकेने येमेनमधील हूती बंडखोरांच्या तळांवर हवाई हल्ले करण्याची पूर्ण तयारी केली होती. अमेरिकन लष्करी कमांडरांनी टार्गेटची यादी तयार करुन लढाऊ विमानांवर बॉम्बही तैनात केले होते. परंतु, प्रत्यक्ष कारवाई सुरु होण्यापूर्वी अगदी काही वेळ आधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक आपला निर्णय बदलला आणि सुरु होणारा हल्ला रोखला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

अलिकडच्या काळात हूती बंडखोरांनी सौदी अरेबियावरील आपले हल्ले अधिक तीव्र केले. याशिवाय तांबड्या समुद्रातील अतिशय महत्त्वाच्या बाब अल-मंदब या सागरी व्यापारी मार्गावरही हूतींचे वर्चस्व आणि कारवाया वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ऊर्जा पुरवठा आणि सागरी व्यापाराच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत संवेदनशील मानला जातो. या वाढत्या लष्करी कारवायांमुळे रियादच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, ज्यामुळे क्राउन प्रिन्स एमबीएस यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवरुन संवाद साधत थेट अमेरिकन लष्करी हस्तक्षेपाची मागणी केली होती. सुरुवातीला अमेरिकेने केवळ गुप्तचर माहिती देण्याचे कबूल केले होते, परंतु नंतर थेट हल्ल्याची तयारी केली गेली.

अमेरिकन अधिकाऱ्यांनी 21 सप्टेंबर रोजी या घडामोडींवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, लढाऊ विमाने उड्डाण भरण्याच्या तयारीत असतानाच ट्रम्प यांनी ही कारवाई स्थगित करण्याचा आदेश दिला. सध्या अमेरिका हुती बंडखोरांवर कोणताही थेट हवाई हल्ला करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्हाईट हाऊसने यावर थेट भाष्य केले नसले तरी, सौदी अरेबियासोबतच्या संरक्षण कराराचे पालन करु आणि मित्रांचे रक्षण करु, असे म्हटले.

दुसऱ्या बाजूला, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी असा दावा केला की, हूती संघटनेने अमेरिकेविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई न करण्याचे आश्वासन दिले. फॉक्स न्यूजशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका आणि हूती यांच्यात सातत्याने संपर्क सुरु असून हूतींना अमेरिकेसोबत युद्ध नको आहे. यापूर्वी 12 सप्टेंबर रोजी आयर्लंड दौऱ्यावर असतानाही त्यांनी हाच दावा केला होता. मात्र, इराणचा पाठिंबा असलेले हुती बंडखोर अमेरिकेला टाळून सौदी अरेबियावर सातत्याने हल्ले करत असल्याने मध्य पूर्वेतील तणाव कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT