अमेरिकन सैन्याने (USA) उत्तर-पश्चिम सीरियामध्ये (Syria) हवाई हल्ला (Drone Attack) केला ज्यात अल-कायदाचा (Al-Qaeda) वरिष्ठ नेता अब्दुल हमीद अल-मातार (Abdul Hamid al-Matar) मारला गेला असल्याचे अमेरिकेकडून सांगितले जात आहे. अमरिकेचे सेंट्रल कमांडचे प्रवक्ते मेजर जॉन रिग्स्बी यांनी ही माहिती दिली आहे. MQ-9 विमानाने केलेल्या या हवाई हल्ल्यात कुठल्याच नागरिकांना इजा झाली नाही असे देखील सांगण्यात आले आहे.(US air attack on Syria killed Al-Qaeda leader Abdul Hamid al-Matar)
अमेरिकेच्या म्हणण्यानुसार अल-कायदा हा अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसाठी कायम धोका आहे. दहशतवादी संघटना सीरियाचा सुरक्षित आश्रयस्थान म्हणून वापर करते आणि येथून दहशतवादी कारवायांची योजना आखते.अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. अमेरिकेचे लष्कर मेजर जॉन रिग्स्बी यांनी एका लेखी निवेदनात म्हटले आहे की, 'या अल-कायदा नेत्याची हत्या दहशतवादी संघटनेच्या जागतिक हल्ल्याच्या योजनांची तोडफोड करेल, आता अमेरिकन नागरिक, आमचे मित्रराष्ट्र आणि निष्पाप लोकांचा छळ आणि हल्ले थांबतील.
यापूर्वी दक्षिण सीरियातील अमेरिकेच्या चौकीवर हल्ला झाल्यानंतर दोन दिवसांनी अमेरिकेने प्रतिऊत्तरादाखील हा हल्ला केला आहे .
दरम्यान गेल्याच महिन्यात, 20 सप्टेंबर रोजी अमेरिकेने हवाई हल्ल्यात अल-कायदाचा नेता सलीम अबू-अहमद याला ठार केले होते . सीरियाच्या इदलिब शहरात हा हल्लाकरण्यात आला होता . सलीमवर अल-कायदासाठी निधीची व्यवस्था करण्याची जबाबदारी होती .याशिवाय तो वेगवेगळ्या भागात हल्ले करण्याची परवानगीही देल असत. आतापर्यंत अमेरिकेने अनेक वेळा अल कायदाचे दहशतवादी आणि इस्लामिक स्टेटचे दहशतवादी बकर अल-बगदादी यांना अशा प्रकारे लक्ष्य केले आहे. खरं तर, बगदादी पूर्व सीरियामधून इडलिबला पळून गेला होता आणि तो इथे लपला होता
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.