रशियातील (Russia) एका केमिकल प्लांटमध्ये (Chemical Plant) मोठा स्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. मॉस्को (Moscow) च्या आग्नेय भागात असलेल्या एका प्लांटमध्ये आग लागली, जिथे स्फोटकांव्यतिरिक्त शस्त्रेही बनवण्यात येतात. दरम्यान अनेक लोक बेपत्ता झाल्याचेही वृत्त आहे. या भीषण स्फोटाशी संबंधित अनेक व्हिडिओ रशियाच्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये, मॉस्कोपासून 300 किमी अंतरावरील जंगलातील लेस्नोये (Lesnoye) गावाच्या कारखान्यात अनेक वाहने आगीत भस्मसात झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
आपत्कालीन मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या आगीमुळे 17 लोक जखमी झाले आहेत. एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर 9 जणांबद्दल अधिक माहिती प्राप्त झालेली नाही. पूर्वी असे म्हटले होते की, रियाझान प्रदेशातील पीजीयूपी इलॅस्टिक फॅक्टरीमध्ये तांत्रिक प्रक्रियेचे आणि सुरक्षा उपायांचे उल्लंघन केल्यामुळे आग लागली असेल. प्लांटच्या वेबसाइटनुसार, आम्ही नागरी वापरासाठी औद्योगिक स्फोटके तयार करतो, परंतु संरक्षण क्षेत्रासाठी दारुगोळा तसेच पाणबुड्यांसाठी गॅस जनरेटर देखील तयार करण्यात येतात.
परिसरात 170 हून अधिक बचाव पथके तैनात
मंत्रालयाने सांगितले की, प्रथम स्थानिक वेळेनुसार 08:22 वाजता प्लांटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. स्थानिक प्रशासनाच्या प्रमुखांनी यापूर्वी TASS वृत्तसंस्थेला सांगितले होते की, आग लागण्याच्या वेळी 17 लोक प्लांटच्या वर्कशॉपमध्ये होते. दरम्यान मंत्रालयाकडून 170 हून अधिक बचाव पथके या भागात तैनात करण्यात आली आहेत. स्फोट एवढा भीषण असल्याने अधिकृत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत यामध्ये 16 लोकांचा मृत्यू झाला आहे.
खराब पायाभूत सुविधांमुळे आग लागते
रशियामध्ये अपघाताने आग लागणे सामान्य बाब बनली आहे. जुन्या आणि खराब पायाभूत सुविधांव्यतिरिक्त सुरक्षा मानकांचे पालन न केल्यामुळे येथे शेकडो आगीच्या घटना नोंदवल्या जातात. अलीकडच्या काळात रशियाची सर्वात भीषण आग आपत्ती 2018 मध्ये सायबेरियन शहर केमेरोव्होच्या एका शॉपिंग सेंटरमध्ये घडली. यामध्ये 41 मुलांसह 64 लोकांचा मृत्यू झाला. इमरजेंसी एग्जिट बंद करणे आणि काम न करणारी अलार्म यंत्रणा यासह सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही आग लागल्याचे तपासकर्त्यांकडू सांगण्यात आले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांना या आग लागण्यामगचे मूळ कारण समजले की, देशभरातील शेकडो व्यावसायिक आणि सांस्कृतिक स्थळे अग्निसुरक्षा मानकांचे पालन करत नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.