इस्रायल आणि इराणमधील तणाव वाढत आहे. या संघर्षाने आता युद्धाचे रुप धारण केले आहे. 13 जूनच्या रात्री इस्रायलने इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य केले. ज्याला 'ऑपरेशन रायझिंग लायन' असे नाव देण्यात आले. दोन्ही बाजूंकडून सतत हल्ले केले जात आहेत. याचदरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना 'भगवद्गीता' देताना दिसत आहे.
खरंतर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि उर्वशी रौतेला यांचा फोटो अगदी खरा आहे. पण सोशल मीडियावर (Social Media) अनेक ठिकाणी तो अलिकडचा असल्याचे म्हटले जात आहे. पण हा जुना फोटो आहे. उर्वशीने नेतन्याहू यांची कधी भेट घेतली आणि त्यांना 'भगवद्गीता' कधी भेट दिली? चला तर मग याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...
दरम्यान, हा व्हायरल फोटो 2021 मधील आहे. जेव्हा अभिनेत्री उर्वशी रौतेला मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धेचे परीक्षक म्हणून इस्रायलला गेली होती. त्यादरम्यान तिने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचीही भेट घेतली होती. तिथे उर्वशीने नेतन्याहू यांना 'भगवद्गीता' भेट दिली होती. यासोबतच ते एकमेकांना त्यांच्या देशाची भाषा शिकवतानाही दिसले होते. अभिनेत्रीने स्वतः हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले होते. एवढचं नाहीतर तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'मला आणि माझ्या कुटुंबाला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद.' आता भगवद्गीतेचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दुसरीकडे, त्या भेटीनंतर उर्वशीने एक मजेदार व्हिडिओ देखील शेअर केला होता. व्हिडिओमध्ये नेतन्याहू असे म्हणताना दिसत होते की, मी तुला हिब्रू शब्द शिकवीन आणि तू मला हिंदी शिकव. सगळ ठीक आहे यास आम्ही, 'सबाबा' म्हणतो. त्यानंतर उर्वशी त्यांना सांगते की, भारतात आम्ही सगळं ठीक आहे यास सब शानदार, सब बढिया असे म्हणतो. तथापि, नेतन्याहू आणि उर्वशी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
ट्विटरवर लोकांनी ट्विट करत लिहिले की, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या लढाईदरम्यान उर्वशी काय करत आहे? तथापि, आम्ही आधीच स्पष्ट केले आहे की, हा जुना फोटो आहे. जेव्हा उर्वशी एका स्पर्धेसाठी इस्रायलला गेली होती.
तर काही लोकांनी लिहिले की, 'नेतन्याहू यांनी संपूर्ण भगवद्गीता वाचली आहे असे दिसते.' त्यावेळी अनेक कलाकारांसोबत उर्वशीचा फोटो व्हायरल झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.