Israel Hamas War: एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे तर दुसरीकडे इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इस्त्रायल गाझा आणि इराणवर सातत्याने हल्ले करत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावरुन इस्त्रायलला सातत्याने विरोधाचा सामना कराला लागत आहे. महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेत लोक खुलेपणाने इस्त्रायलचा विरोध करत आहेत.
दरम्यान, गाझामध्ये पॅलेस्टिनी दहशतवाद्यांशी सुरु असलेली भीषण लढाई आणि इराणसोबतच्या संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकनांवर चांगलेच संतापले. अमेरिकन विद्यापीठांमध्ये सुरु असलेल्या इस्त्रायलविरोधी निदर्शनांचा त्यांनी तीव्र निषेध केला. ते म्हणाले की, अमेरिकेतील महाविद्यालयांमध्ये जे काही चालले आहे ते भयानक आहे. आम्हाला संपवण्याच्या घोषणा दिल्या जात आहेत. नेतन्याहू पुढे म्हणाले की, अमेरिकेत जे काही घडत आहे ते 1930 च्या हिटलर राजवटीत जर्मन विद्यापीठांची आठवण करुन देणारे आहे. दुसरीकडे, बायडन सरकारने नेतन्याहू यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे.
एका व्हिडिओ संदेशात नेतन्याहू यांनी आरोप केला की, अमेरिकेत यहूदीविरोधी भावनांनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अमेरिकेच्या कॉलेज कॅम्पसमध्ये जे घडत आहे ते भयानक आहे." ते पुढे म्हणाले की, ''सेमिटिक-विरोधी जमावांनी प्रमुख विद्यापीठे ताब्यात घेतली आहेत. ते इस्रायलच्या नाशाची हाक देत आहेत. त्यांनी ज्यू विद्यार्थ्यांवर हल्ला केला. त्यांनी ज्यू कंपाउंडवरही हल्ला केला. हे 1930 च्या दशकात जर्मन विद्यापीठांमध्ये काय घडले होते याची आठवण करुन देते."
''गाझामध्ये इस्रायली लष्कराकडून सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात कोलंबिया, हार्वर्ड, येल आणि न्यूयॉर्क विद्यापीठासह अनेक प्रतिष्ठित अमेरिकन विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. शेकडो लोकांना अटक करण्यात आली असली तरी निदर्शने थांबत नाहीत, हे योग्य नाही," असेही नेतन्याहू पुढे म्हणाले.
जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, गाझामध्ये 9 हजारांहून अधिक रुग्ण आहेत, ज्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. ज्यांना परदेशात नेऊन लवकरात लवकर उपचार देण्याची गरज आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या लोकांमध्ये अनेक रुग्ण जुन्या आजारांनी त्रस्त आहेत. यापैकी एक 12 वर्षांची मुलगी आहे, जी गंभीररित्या आजारी आहे. तिच्या काळजी आणि उपचारासाठी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पथक कार्यरत आहे. दुसरीकडे, हल्ल्यांसोबतच गाझामध्ये उपासमारीचे संकटही अधिक गडद होत चालले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.