Joe Biden & Shahbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan And USA: पाकचा USA ला इशारा, 'भारत रशियाकडून तेल खरेदी करु शकतो तर...'

Pakistan Warns US: रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून अमेरिका पाकिस्तानला रोखू शकत नाही.

दैनिक गोमन्तक

Russia Ukraine War: रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत पाकिस्तानने अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून अमेरिका पाकिस्तानला रोखू शकत नाही, असे पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी म्हटले आहे. दुबईत पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) च्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना दार यांनी ही टिप्पणी केली.

आणखी काय म्हणाले पाकिस्तानचे अर्थमंत्री?

पाश्चात्य निर्बंधांदरम्यान दार यांनी रशियाकडून (Russia) तेल खरेदी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ते पुढे म्हणाले की, 'आम्ही अमेरिकेच्या (राज्य विभाग) अधिकार्‍यांना सांगितले की, अमेरिका आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून रोखू शकत नाही, कारण आपला शेजारी देश भारत देखील रशियाकडून तेल खरेदी करत आहे.'

याआधी, पाकिस्तानने (Pakistan) म्हटले होते की, रशियाकडून तेल खरेदी करण्यात पाकिस्तानला रस आहे. भारतासारख्याच अटींवर रशियाकडून तेल खरेदी करण्याचा मंत्रालय प्रयत्न करेल, असा पुनरुच्चार पाकिस्तानी मंत्र्यांनी केला. दार पुढे म्हणाले की, येत्या काही महिन्यांत तुम्हाला दिसेल की, सरकार या संदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलेल.

तसेच, 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण झाल्यापासून अमेरिका (America) आणि युरोपीय देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. मात्र, युक्रेन युद्ध आणि पाश्चिमात्य देशांकडून टीका होत असतानाही भारत रशियाकडून तेल आयात वाढवत आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तान हा जगातील 35 वा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार आहे. 2020-21 मध्ये त्याने $1.92 अब्ज किमतीचे कच्चे तेल आयात केले. नोव्हेंबरच्या सुरुवातीला, पाकिस्तान सरकारने देशांतर्गत कमतरता पूर्ण करण्यासाठी रशियाकडून 300,000 टन गहू आयात करण्यासाठी सुमारे USD 112 दशलक्ष किमतीच्या कराराला मान्यता दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठे यश; पाचजणांना अटक, हल्ल्याचे कारण येणार समोर?

Ankola Road Accident: राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! अंकोलाजवळ बस आणि टँकरची समोरासमोर धडक; दोघे जागीच ठार, पाच जखमी

Rama Kankonkar Assault: 'दोषींना सोडणार नाही...' रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध; कठोर कारवाईचे दिले निर्देश

पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून करायचा शोषण... योग गुरु निरंजन मूर्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8 महिलांनाही बनवले वासनेचे शिकार

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

SCROLL FOR NEXT