Pakistan's Drones : सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीत तब्बल 250 टक्क्यांची वाढ

बहुतांश घटना पंजाबमध्ये; सीमेपलीकडून शस्त्रास्त्रांसह दारूगोळा, अमली पदार्थांची तस्करी
Another drone conspiracy of Pakistan failed
Another drone conspiracy of Pakistan failedDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistani Drones Infiltration: पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर वारंवार ड्रोनमार्फत घुसखोरी केली जात आहे. सन 2021 च्या तुलनेत यावर्षी म्हणजेच 2022 मध्ये पाकिस्तानच्या अशा ड्रोन घुसखोरीच्या घटनांमध्ये तब्बल अडीचशे टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे डायरेक्टर जनरल पंकजकुमार सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

Another drone conspiracy of Pakistan failed
Gujarat-Himachal Election: गुजरात, हिमाचलमध्ये 'इतके' कोटी रूपये जप्त

या ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान अमली पदार्थ, शस्त्रे, दारूगोळा असे साहित्य भारतीय हद्दित पाठवत असल्याचे उघड झाले आहे. ड्रोन घुसखोरीचच्या बहुतांश घटना पंजाबमध्ये घडून आलेल्या आहेत. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ने अशा 215 ड्रोन्सना आत्तापर्यंत पाडले आहे.

सिंह यांनी सांगितले की, बीएसएफ गेल्या काही काळापासून या ड्रोन घुसखोरीच्या घटनांचा सामना करत आहे. या ड्रोन्सची क्वालिटी ही आमच्यासाठी डोकेदुखी आहे. सन 2020 मध्ये बीएसएफने भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर 79 ड्रोन घुसखोरी झाली होती. गतवर्षी या ड्रोन्सची संख्या 109 इतकी होती तर यंदा 266 ड्रोन घुसखोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजेत यातील सर्वाधिक 215 ड्रोन पंजाबमध्ये पाहण्यात आले आहेत. तर जम्मूमध्ये 22 ड्रोन पाहण्यात आले आहेत.

Another drone conspiracy of Pakistan failed
Nose Grown On Hand: डॉक्टरांनी महिलेच्या हातावर उगवले नाक; फ्रान्समध्ये विचित्र शस्त्रक्रिया

लॅबमध्ये ड्रोनच्या चिपची तपासणी

सिंह म्हणाले, ही गंभीर समस्या आहे. आमच्याकडे याचे उत्तर नाही. अमली पदार्थ, शस्त्रे, दारूगोळा याची तस्करी याद्वारे केली जात आहे. जेव्हा एखादे ड्रोन भारतीय हद्दीत येते तेव्हा ते कुठून येते याबाबत काहीही माहिती नसते. गतवर्षी दिल्लीत एक ड्रोन रिपेयर लॅब स्थापन केली होती. तिथे या ड्रोनमधील चिपची फॉरेन्सिक तपासणी केली जाते. या लॅबवर 50 लाख रुपए खर्च केले गेले आहेत. फ्लाइट पाथ, लॉन्चिंग आणि लँडिंग पॉईंट्स, जीपीएस तसेच पाठवलेले किंवा मिळालेले मेसेज ही सर्व माहिती मिळू शकते.

ड्रोन पाडणाऱ्यांना पुरस्कार

बीएसएफकडे भारताच्या 3,000 किलोमीटरहून अधिक लांबीच्या सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. जी गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मिर अशी आहे. या वर्षभरात 11 ड्रोन्स पाडले गेले आहेत. ड्रोन्स पाडणाऱ्यांना रोख रकमेचा पुरस्कार देण्याची सुरवात करण्यात आली आहे, असे सिंह यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com