Afghanistan Citizens  Dainik Gomantak
ग्लोबल

UNHCR: अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिघडली तर, 5 लाख लोक देश सोडू शकतात?

गेल्या आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तावर केलेल्या कब्जामुळे अफगाणिस्तानची (Afghanistan) परिस्थिती अधिकच बिकट होत चालली असल्याने दुसरीकडे जगभरातील राजकिय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत.

दैनिक गोमन्तक

संयुक्त राष्ट्राची शरणार्थी संस्था UNHCR च्या अंदाजानुसार येत्या काही महिन्यांत अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणखी बिघडली तर सुमारे साडेपाच लाख लोक देश सोडून जाऊ शकतात. यूएनएचसीआरचे म्हणणे आहे की, गेल्या आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तावर केलेल्या कब्जामुळे अफगाणिस्तानची परिस्थिती अधिकच बिकट होत चालली असल्याने दुसरीकडे जगभरातील राजकिय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. एजन्सीच्या मते, 5,15,000 नागरिक नव्याने देश सोडून जाऊ शकतात.

दरम्यान, एजन्सीने म्हटले आहे की, सुमारे 2.2 दशलक्ष अफगाणी आधीच परदेशात निर्वासित म्हणून नोंदणीकृत आहेत. ते सर्व अफगाणिस्तानच्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तान आणि इराणमध्ये आहेत. संपूर्ण अफगाणिस्तानात हिंसाचार वाढणे आणि निवडून आलेले सरकार उलथवून टाकल्याने नागरिकांवर अनेक बंधने लादली जात आहेत. त्यामुळे आणखी लोक विस्थापीत होऊ शकतात. (UNHCR on Afghanistan). एजन्सीचा अंदाज आहे की, केवळ या वर्षी 5,58,000 लोक सशस्त्र संघर्षामुळे अफगाणिस्तानमध्ये अंतर्गत विस्थापित झाले आहेत.

दोन्ही ठिकाणी विस्थापितांची संख्या वाढेल

यूएनएचसीआरचा अंदाज आहे की, विस्थापित लोकांची संख्या येत्या काही दिवसांत अंतर्गत आणि सीमा ओलांडून वाढेल. एजन्सी लोकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या योजनेसाठी सुमारे 300 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मागणी करत आहे. लाखो अफगाण नागरिकांनी आधीच पाकिस्तानात (Afghan Refugees) आश्रय घेतला आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेला लागून आहे, त्यामुळे तालिबानने परत सत्ता मिळवल्यानंतर ज्यांना विमानाने इतर देशांमध्ये जाणे शक्य नाही, त्यांनी पाकिस्तानकडे वळले आहेत.

4 हजार लोक पाकिस्तानात राहतील

पाकिस्तान अफगाणिस्तानातून येणाऱ्या सुमारे 4,000 लोकांच्या निवासाची व्यवस्था करत आहे, मुख्यतः अफगाण नागरिक. हे लोक मर्यादित कालावधीसाठी पाकिस्तानमध्ये राहतील (Afghan Refugees in Pakistan). अमेरिकन दूतावासाने पाकिस्तान सरकारला अफगाणिस्तानातून आपले सैन्य पूर्णपणे काढून घेण्याच्या 31 ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना मदत करण्याची विनंती केली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की दूतावासाने तीन श्रेणींमध्ये प्रवाशांना सामावून घेण्याची किंवा हस्तांतरित करण्याची परवानगी मागितली, जे अमेरिकन मुत्सद्दी/नागरिक, अफगाण नागरिक आणि इतर देशांचे लोक आहेत.

कराची आणि इस्लामाबादमध्ये लोक राहतील

युद्धादरम्यान नाटो सैन्याला मदत करणाऱ्या अफगाणांसह सुमारे 4,000 लोकांना अमेरिकेत नेण्यापूर्वी थोडक्यात कराची आणि इस्लामाबादला आणले जाईल (Afghanistan Current Situation). इस्लामाबाद प्रशासन अभ्यागतांना सामावून घेण्यासाठी उपाययोजना करत आहे. राजधानी आणि शेजारील रावळपिंडीमधील 150 हून अधिक हॉटेल्सना आदेश देण्यात आले आहेत की, सुमारे तीन आठवड्यांसाठी अफगाण नागरिकांना राहण्यासाठी स्थानिकांचे बुकिंग थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमानतळ आणि विमानतळाला राजधानीशी जोडणाऱ्या मुख्य महामार्गाच्या आसपासही सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT