UN report warning about rising sea levels and flood risk in Mumbai and Kolkata Dainik Gomantak
ग्लोबल

UN Report: मुंबई-कोलकाता बुडणार? 14000000 लोकांच्या जिवाला थेट धोका; नेपाळ दुर्घटनेनंतर 'युनो'चा भारताला धडकी भरवणारा इशारा

UN Report Mumbai Kolkata Submersion Warning: संयुक्त राष्ट्राने भारतासाठी अत्यंत चिंताजनक आणि धडकी भरवणारा इशारा जारी केला.

Manish Jadhav

UN Report Mumbai Kolkata Submersion Warning: नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी जलप्रलयात तब्बल 8 जिल्ह्यांचे नावोनिशाण मिटले असून या भीषण दुर्घटनेनंतर संयुक्त राष्ट्राने भारतासाठी अत्यंत चिंताजनक आणि धडकी भरवणारा इशारा जारी केला. ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलामुळे हिमनद्या वेगाने वितळत असून महासागरांची पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापलीकडे वाढत आहे.

जर समुद्राचे पाणी तटांच्या भिंती तोडून शहरांमध्ये घुसले, तर भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि पश्चिम बंगालमधील कोलकाता ही दोन्ही प्रमुख शहरे पाण्यात बुडण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या दोन महागंभीर संकटांमुळे 1.4 कोटींहून अधिक नागरिकांच्या जिवाला थेट धोका पोहोचू शकतो.

युनोच्या रिपोर्टनुसार, केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियातील डेल्टा प्रदेश आणि बांगलादेशातील ढाका शहरावरही हे संकट घोंघावत आहे. 2014 ते 2023 दरम्यान समुद्राच्या पाण्याची पातळी दरवर्षी 4.7 मिलीमीटरने वाढली, तर 2024 मध्ये हे प्रमाण 5.9 मिलीमीटर या विक्रमी स्तरावर पोहोचले. महासागरांचे तापमान इतके वाढले आहे की, गेल्या 4000 वर्षांतील सर्व विक्रम मोडले गेले आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे समुद्राचे पाणी सातत्याने हा धोका निर्माण होत आहे. परिणामी, किनारपट्टीवरील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, ऊर्जानिर्मिती केंद्र आणि इमारतींचे अतोनात नुकसान होण्याचा इशारा देण्यात आला.

समुद्राची पातळी वाढल्याने जनआरोग्यावरही त्याचा अत्यंत घातक परिणाम होणार आहे. तटीय भागात पिण्याच्या पाण्यात खारटपणा वाढणे, साथीचे रोग पसरणे, मानसिक ताणतणाव आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे विस्थापन होण्याचा धोका आहे. जगभरातील सुमारे 10 टक्के लोकसंख्या ही किनारपट्टीच्या भागात राहते, ज्यांच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. युनोने भारत (India) आणि बांगलादेश सरकारला आपत्कालीन यंत्रणा उभारण्याचे आणि संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तत्काळ ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. 2050 पर्यंत ही परिस्थिती आणखी भयानक रुप धारण करु शकते, ज्यामुळे जागतिक चिंतेत प्रचंड वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT