Ukrainian Women Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine War: 'सेक्सी ड्रेस' घाला, युक्रेनियन महिलांना का केलं जातयं आवाहन

Russia-Ukraine Conflict: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं काही नाव घेत नाही.

दैनिक गोमन्तक

Russia-Ukraine Conflict: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं काही नाव घेत नाही. दरम्यान, युक्रेनच्या महिलांना सेक्सी ड्रेस परिधान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे रशियाचा त्रास वाढू शकतो. युक्रेनियन नागरिकांचे म्हणणे आहे की, असे करुन महिला #FreeTheLeopards मोहिमेत सहभागी होतील. युक्रेनमध्ये ही मोहीम चालवली जात असून रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनने जर्मनीला लेपर्ड बॅटल टँक देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, जर्मनीने अद्याप युक्रेनची ही मागणी मान्य केलेली नाही.

युक्रेनची खास योजना काय आहे?

डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, #FreeTheLeopards मोहीम चालवून युक्रेन जर्मन सरकारला आपले Leopard युद्ध रणगाडे पाठवण्याचे आवाहन करत आहे, जेणेकरुन रशियाविरुध्द त्याचा वापर करता येईल.

झेलेन्स्की यांच्या सहाय्यकाने हा दावा केला

मात्र, जर्मनीने (Germany) आतापर्यंत Leopard बॅटल टँकबाबत युक्रेनच्या मागणीला दुजोर दिलेला नाही. परंतु, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे निकवर्तीय मायखाइलो पोडोल्याक यांनी दावा केला की, दोन्ही देशात लवकरात-लवकर करार होऊ शकतो.

जर्मनी आणि युक्रेनमध्ये होणार चर्चा!

विशेष म्हणजे, रशिया (Russia) आणि युक्रेनमधील युद्ध सुरु होऊन 8 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. दोन्ही बाजूंचे हजारो सैनिक मारले गेले आहेत. रशियाने युक्रेनमधील 4 प्रांत आपल्या देशात विलीन केले आहेत. दुसरीकडे, युक्रेनही (Ukraine) हार मानायला तयार नाही. रशियाच्या ताब्यातील काही भूभाग परत घेतल्याचा दावाही युक्रेनने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT