Russia-Ukraine War: रशियाने उद्धवस्त केली युक्रेनची 30 टक्के वीज पुरवठा केंद्रे

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा; युक्रेनमधील अनेक शहरांवर रशियाकडून ड्रोन हल्ले
Russia Vs Ukraine War
Russia Vs Ukraine WarDainik Gomantak
Published on
Updated on

Russia-Ukraine War: गेल्या काही दिवसात रशियाने आक्रमक धोरण स्विकारत युक्रेनविरोधातील हल्ले तीव्र केले आहेत. आधी रशियाने 84 क्षेपणास्त्रे डागली. त्यानंतर सोमवारी ड्रोनद्वारे हल्ले केले. त्यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलदोमिर झेलेन्स्की यांनी रशियाने एका आठवड्यात 31 टक्के वीज केंद्रे नष्ट केल्याचा दावा केला आहे.

Russia Vs Ukraine War
Protest Against America in Pakistan: अमेरिकेच्या राजदुताला देशातून तत्काळ हाकला; पाकिस्तानात आंदोलकांची मागणी

झेलन्स्की म्हणाले की, रशियन फौजांनी युक्रेनच्या उर्जाविषयक पायाभूत सुविधांवर हल्ला चढविला आहे. वीज पुरवठा केंद्रांना लक्ष्य केले जात आहे. सुमी आणि केंद्रीय निप्रॉपेट्रोस क्षेत्रात झालेल्या ड्रोन हल्ल्यात वीज केंद्रे उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

युक्रेनच्या एका मंत्र्याने ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओही ट्विटरवरून शेअर केला आहे. इराणनिर्मित ड्रोनद्वारे हे हल्ले केले गेले आहेत. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, रशियाकडे इराणने बनवलेली ड्रोन आहेत. शाहिद ड्रोन असे या ड्रोनचे नाव आहे. रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये अनेक इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. या हल्ल्यात एका गर्भवतीसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Russia Vs Ukraine War
Jayalalithaa Death Probe: जयललिता यांच्या मृत्युप्रकरणी शशिकलांवर आरोप

या आधी सोमवारी रशियाने युक्रेनवर 84 क्षेपणास्त्रे डागली होती. यातून कीव्हसह अनेक शहरांना लक्ष्य केले गेले होते. यात 19 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाला सात महिने पुर्ण व्हायला आले आहेत. तरीही अद्याप या युद्धात कुणाचीही सरशी झालेली नाही. काही दिवसांपुर्वीच रशियाने युक्रेनमधील काही महत्वाच्या प्रांतावर ताबा मिळवल्याचे जाहीर करत या प्रांतातील हल्ला हा रशियावरील हल्ला समजले जाईल, असे जाहीर केले होते.

काही दिवसांपुर्वीच युक्रेनच्या विरोधात युद्ध पुकारणाऱ्या रशियाला संयुक्त राष्ट्रात मोठा फटका बसला आहे. युक्रेनमधील चार राज्यांचे विलीनीकरण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने प्रचंड बहुमताने रशियाचा निषेध करणारा ठराव मंजूर केला. या मतदानात 143 देशांनी रशियाच्या विरोधात मतदान केले, तर 5 देशांनी त्याच्या बाजूने मतदान केले. त्याच वेळी, 35 देश मतदानाला अनुपस्थित होते. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत एकूण 193 सदस्य राष्ट्रे आहेत. हा प्रस्ताव जगातील बहुतांश देशांकडून युक्रेनसाठी मोठा पाठिंबा मानला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com