Russia  Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine: युद्धाची ठिणगी पेटली? रशियन समर्थक बंडखोरांकडून युक्रेनवर गोळीबार

रशियन-समर्थित बंडखोर गटांचे म्हणणे आहे की, युक्रेनच्या (Ukraine) सरकारने आमच्या ताब्यात असलेल्या पूर्वेकडील प्रदेशांवर गोळीबार करुन युद्धविराम कराराचे उल्लंघन केले आहे.

दैनिक गोमन्तक

युक्रेनमध्ये रशियन हल्ल्याच्या धोक्यादरम्यान पहिल्यांदाच शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला आहे. रशियन-समर्थित बंडखोर गटांचे म्हणणे आहे की, युक्रेनच्या सरकारने आमच्या ताब्यात असलेल्या पूर्वेकडील प्रदेशांवर गोळीबार करुन युद्धविराम कराराचे उल्लंघन केले आहे. (Ukrainian Officials Say The Firing Came From Russia)

इंडिपेंडंट या ब्रिटीश वृत्तपत्रानुसार, रशियाच्या (Russia) ताब्यात असलेल्या लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक प्रांताच्या प्रतिनिधींनी युक्रेनियन सैन्यावर आरोप केले आहेत. युरोपवर महिनाभरापासून युद्धाचे संकट असताना प्रथमच युद्धसामुग्रीचा वापर केल्याची बातमी समोर आली आहे.

दरम्यान, रशियाच्या न्यूज एजन्सी इंटरफॅक्सच्या मते, लुहान्स्कच्या विद्रोही भागात युक्रेनियन सैन्याने युद्धविरामाचे उल्लंघन केले असून शस्त्रांचा वापर केला आहे. मिन्स्क करारानुसार, युद्धविराम आता संपला पाहिजे.

युक्रेनच्या अधिकार्‍यांनी मात्र विद्रोही भागावरील हल्ल्यांचे वृत्त फेटाळून लावत म्हटले की, हे हल्ले आमच्यावर झाले पंरतु आम्ही प्रत्युत्तर दिले नाही.

विशेष म्हणजे, रशिया युक्रेनवर (Ukraine) हल्ला करण्यासाठी स्वतःवर प्रॉक्सी हल्ल्याचा कट रचू शकतो, जेणेकरुन बदला घेण्याच्या नावाखाली तो युक्रेनवर हल्ला करु शकेल, असे अमेरिकेने म्हटले होते.

तसेच, युक्रेनच्या लष्कराने गुरुवारी रशियन समर्थक सैन्याने लुहान्स्कमधील एका गावात प्रीस्कूलवर गोळीबार केल्याचा आरोपही केला आहे.

युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, 'यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.' गेल्या काही वर्षांत दोन्ही बाजूंकडून गोळीबार होत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत, त्यातच रशियाने युक्रेनला युद्धाची धमकी दिल्याने गुरुवारी गोळीबार झाल्याच्या बातम्या आल्या आहेत.

युक्रेनच्या सीमेवर सुमारे 1 लाख रशियन सैन्य तैनात आहे. बुधवारी, एका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना, युक्रेनच्या सीमेवरुन रशियन सैन्याने माघार घेतल्याचे वृत्त फेटाळून लावले. ते पुढे म्हणाले की, बायडन प्रशासनाने याची पुष्टी केली आहे की, "रशियाने युक्रेनच्या सीमेवर 7,000 सैन्य पाठवले आहे. त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त सैन्य बुधवारीच पोहोचले आहे."

शिवाय, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी सांगितले होते की, आमचे सैन्य युक्रेनच्या सीमेनजिक युध्दाभ्यास संपवून परत आले आहे. त्यानंतर एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये रशियन सैन्य क्रिमियामधून परतताना दाखवण्यात आले. परंतु अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी एमएसएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "रणनीती पथके" सीमेकडे जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT