Russia Ukraine Conflict: रशियाने (Russia) युक्रेनच्या (Ukraine) सीमेजवळ 100,000 हून अधिक सैन्य जमा केले आहे, ज्यामुळे प्रदेशात युद्धाची भीती निर्माण झाली आहे. आपण हल्ल्याची योजना आखत असल्याचा रशियाने सातत्याने नाकारले आहे. मात्र रशिया युद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि त्यासाठी तयारी करत असल्याचे अमेरिका आणि त्याच्या नाटो सहयोगी देशांचे मत आहे. युक्रेनवरील आंतरराष्ट्रीय तणावाबद्दल जाणून घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत, ज्या शीतयुद्धाची आठवण करून देतात.
दरम्यान, युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी तणाव वाढल्याने परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पूर्व युक्रेनमधील सैनिक आणि नागरिक युद्ध होते की नाही याची अधीरतेने वाट पाहत आहेत. युक्रेनचे भवितव्य इतर देशातील राजकारणी ठरवत असल्याचा त्यांचा विश्वास आहे. 2014 पासून या युद्धग्रस्त भागात रशिया समर्थक फुटीरतावादी लढवय्यांशी लढा सुरू आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी म्हटले आहे की, हे असे क्षेत्र आहे जिथे रशियाने हजारो सैन्य जमा केले आहे आणि ते दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे आक्रमण करू शकतात. अशा परिस्थितीत दोन देशांमध्ये युद्ध झाले तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल असा प्रश्नही हि परिस्थिती बघून निर्माण होतो आहे.
भारतावर काय परिणाम होणार?
तज्ज्ञांच्या मतानुसार, हे युद्ध झाल्यास रशियाला मित्र राष्ट्रांची गरज भासेल. यावेळी चीन हा त्यांचा मोठा मित्र मानला जातो. पाश्चात्य निर्बंधांमुळे चीन रशियालाही पाठिंबा देऊ शकतो. युक्रेनने नाटोचा सदस्य होऊ नये, याला चीनही पाठिंबा देत आहे. अशा परिस्थितीत पाश्चात्य देशांकडून रशियावर बंदी घातल्यास चीन त्याची भरपाई करू शकतो, ज्यामुळे चीन आणि रशियाची जवळीक वाढेल, ज्यामुळे भारत (India) आणि रशियाच्या मैत्रीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारताचा सुमारे 60 टक्के लष्करी पुरवठा रशियाकडून येतो, जो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अलीकडेच, भारत आणि रशियाने S400 क्षेपणास्त्र प्रणाली आणि AK-203 असॉल्ट रायफलशी संबंधित करारांसह अनेक महत्त्वपूर्ण संरक्षण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यासोबतच पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन आधीच आमनेसामने आहेत. अशा स्थितीत भारत रशियाशी संबंध बिघडवण्याचा कोणताही धोका पत्करू शकत नाही.
त्याचबरोबर अमेरिका हा भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे. अनेक महत्त्वाच्या प्रसंगी आणि मुद्द्यांवर अमेरिकेने भारताला नेहमीच पाठिंबा दिला आहे. अशा परिस्थितीत भारत ना रशियाशी सौदा करू शकत ना अमेरिकेशी. त्यामुळे भारतासाठी देखील ही परिस्थिती गंभीर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.