Joe Biden
Joe Biden Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: ''युक्रेन पुतिन यांच्यासाठी ख्रिसमस भेट असेल...''; झेलेन्स्कीला भेटल्यानंतर बायडन असं का म्हणाले?

Manish Jadhav

Joe Biden Statement On Russia And Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला दोन महिन्यांत तीन वर्षे पूर्ण होतील. जवळपास 90 टक्के सैनिक मारले गेले आणि अर्ध्याहून अधिक टॅंक नष्ट झाले, तरीही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला जोडण्याची इच्छा सोडलेली नाही. या महायुद्धात अमेरिकेसह अनेक युरोपीय देश युक्रेनला मदत करत आहेत. या मदतीने युक्रेनचे सैन्य रशियावर मात करत आहे. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा एकदा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. बायडन यांनी युक्रेनला मदत सुरु ठेवण्याचे आवाहन केले. अमेरिकेने माघार घेतल्यास पुतिन यांच्यासाठी ख्रिसमसची भेट असेल, असे ते म्हणाले. अमेरिकेने आतापर्यंत युक्रेनला 1100 दशलक्ष डॉलर्सची मदत दिली आहे. मात्र, युक्रेनला मदत पाठवणे अमेरिकेसाठी तितके सोपे नाही. अमेरिकेत युक्रेनबाबत दोन मतप्रवाह आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनचे सर्वोच्च नेते वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. बायडन यांनी सांगितले की, कीवसाठी नवीन लष्करी मदत मंजूर करण्यात काँग्रेस अयशस्वी झाल्यास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना "ख्रिसमस भेट" सारखे असेल. यादरम्यान बायडन यांनी घोषणा केली की, अमेरिका युक्रेनला नवीन मदतीअंतर्गत 60 दशलक्ष डॉलर्सची मदत करेल. मात्र, या मदतीला काही अमेरिकन कायदेतज्ज्ञ विरोध करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. व्हाईट हाऊसमध्ये एका उच्चस्तरीय बैठकीत बायडन आणि झेलेन्स्की यांनी पुन्हा रशियन आक्रमणाविरुद्ध संयुक्त मोहिमेचे आवाहन केले.

कोणते खासदार मदतीला विरोध करत आहेत?

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले की, त्यांना युक्रेनला मदत करायची आहे, परंतु रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांना युक्रेनला आणखी मदत द्यायची नाही. व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, रिपब्लिकन पक्षाचे खासदार अमेरिकन सीमेवर सुरक्षा बळकट करण्याची मागणी करत आहेत. युक्रेनला पैसे देण्याऐवजी हा पैसा सीमा मजबूत करण्यासाठी वापरला जावा, असे त्यांचे म्हणणे आहे. किंबहुना, इस्रायल-हमास आणि युक्रेन-रशिया युद्धात अमेरिकेच्या भूमिकेमुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे, असे विरोधी खासदारांचे मत आहे.

युक्रेन अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून आहे

रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या युद्धात अमेरिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अमेरिका पूर्वीपासून रशियाचा कट्टर विरोधक आहे. आता फेब्रुवारी 2021 पासून रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरु केले आहे. अमेरिकेने उघडपणे युक्रेनला पाठिंबा दिला आहे. आर्थिक मदतीव्यतिरिक्त अमेरिका लष्करी मदतीद्वारे रशियाला सातत्याने धक्के देत आहे. केवळ अमेरिकन मदतीच्या जोरावरच युक्रेन इतके दिवस रशियाच्या विरोधात उभा राहिला आहे. आता युक्रेनला अमेरिकेची मदत मिळाली नाही तर युक्रेनचे युद्धात मोठे नुकसान होऊ शकते. अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेन युद्धात टिकू शकणार नाही, असे वृत्त आहे. दुसरीकडे, रशियाही याचीच वाट पाहत आहे.

रशियाने एका रात्रीत 42 ड्रोन आणि 6 क्षेपणास्त्रे डागली

युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धादरम्यान, कीवने आपल्या ताज्या वक्तव्यात म्हटले आहे की, रशियाने युक्रेनवर एका रात्रीत 42 ड्रोन आणि 6 क्षेपणास्त्रे डागली. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने 41 ड्रोन नष्ट केले, परंतु इमारती, गोदामांचे नुकसान झाले. तसेच, दक्षिण भागात झालेल्या हल्ल्यात 11 जण जखमी झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT