Russia-Ukraine War: युक्रेनला नाटो देशांचा पाठिंबा मिळत नाहीये? जर्मनी म्हणाला - "युक्रेन आमचा मित्र देश नाही..."
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन यांच्यात मागील 22 महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. मात्र आता, या संघर्षात युक्रेनकडून प्रतिकार म्हणावा तसा होत नाहीये. याचे कारण उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) देशांकडून कीवला मिळणारा पाठिंबा सातत्याने कमी होत आहे.
अशा परिस्थितीत युक्रेनकडे युद्ध लढण्यासाठी शस्त्रास्त्रांची तीव्र कमतरता आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पुन्हा विविध देशांचा दौरा करुन पाठिंबा मिळवत आहेत. मात्र त्यांना युद्धासाठी अपेक्षित पाठिंबा आणि शस्त्रसामग्री मिळत नाहीये.
अशा स्थितीत युक्रेनियन सैनिकांचे मनोधैर्य खचत चालले आहे. मात्र दुसरीकडे, रशियन सैन्यांचे वर्चस्व वाढत आहे. विशेष म्हणजे, युक्रेनला जाणूनबुजून शस्त्रे दिली जात नसल्याचा आरोप जर्मनीवर होत आहे. जेणेकरुन कीव रशियाचा प्रतिकार रोखण्यात अपयशी ठरेल.
दरम्यान, त्यांच्यावरील या आरोपांना उत्तर देताना जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस म्हणाले की, 'कीव आमचा सहयोगी नाही.' मात्र, असे असतानाही जर्मनी युक्रेनला पूर्ण मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. जाणूनबुजून शस्त्रे पुरवली नसल्याचा त्यांच्यावरचा आरोप खोटा आहे. पिस्टोरियस पुढे म्हणाले की, 'जर्मनीप्रमाणेच (Germany) इतर देशांकडूनही युक्रेनला मिळणारा पाठिंबा कमी झाला आहे. एकट्या जर्मनीचा यात सहभाग नाही. सर्व नाटो देश युक्रेनला मदत करण्यास सक्षम नाहीत.'
युक्रेनचा पाठिंबा कमी होण्यामागचे कारण जर्मनीने स्पष्ट केले
युक्रेनला (Ukraine) शस्त्रास्त्रांचा पुरवठा कमी होण्यामागचे कारण सांगून जर्मनीच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, युरोपीय संरक्षण उत्पादन कमी होत आहे. ते वाढवावे लागेल. कीवला युद्धभूमीवर मोठा फायदा होण्यापासून रोखण्यासाठी जर्मन लष्कर मदत देण्यास उशीर करत असल्याची अटकळ त्यांनी नाकारली.
बोरिस पिस्टोरियस यांनी एका मुलाखतीत आठवण करुन दिली की युक्रेन हा जर्मनीचा मित्र देश नाही. " सध्या आमच्यासमोर ही समस्या आहे की शस्त्र उद्योग काही भागात आवश्यक तितक्या वेगाने पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याला गती देण्याची गरज आहे, असेही ते पुढे म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.