Iranian Ship Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Iranian Ship Attack: कॅस्पियन समुद्रात हायव्होल्टेज ड्रामा! युक्रेनचा इराणी जहाजावर हल्ला, भडकलेल्या इराणचा झेलेन्स्कींना अल्टीमेटम; "किंमत चुकवावी लागणार!"

Ukraine Attack On Iranian Commercial Ship Caspian Sea: मध्य पूर्वेतील युद्धाच्या ज्वाळा आता थेट युरोपपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. कॅस्पियन समुद्रात इराणच्या एका मालवाहू जहाजावर युक्रेनने क्षेपणास्त्र हल्ला केल्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ उडाली.

Manish Jadhav

Ukraine Attack On Iranian Commercial Ship: मध्य पूर्वेतील युद्धाच्या ज्वाळा आता थेट युरोपपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. कॅस्पियन समुद्रात इराणच्या एका मालवाहू जहाजावर युक्रेनने क्षेपणास्त्र हल्ला केल्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ उडाली. या भयंकर हल्ल्यात एका इराणी खलाशाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे इराणचा तिळपापड झाला असून इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रमुख इब्राहीम अझीझी आणि परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी युक्रेनला थेट अल्टीमेटम देत गंभीर परिणामांची चेतावणी दिली.

इराणवर आक्रमण करणाऱ्या प्रत्येकाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागते, हे अमेरिका आणि इस्रायलला चांगलेच ठाऊक आहे; आता युक्रेनलाही याची लवकरच जाणीव होईल, अशा कडक शब्दांत इराणने इशारा दिला.

इराणी परराष्ट्र मंत्री अराघची यांनी 'एक्स' वर पोस्ट करत आरोप केला की, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी इस्रायलच्या सांगण्यावरुन हा हल्ला घडवून आणला. युरोपला आपल्या युद्धात खेचण्याबरोबर लक्ष विचलित करण्यासाठीच हा कट रचण्यात आल्याचा दावा इराणने केला. हा हल्ला संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे स्पष्ट उल्लंघन असून कीव्हमध्ये बसलेल्या नेतृत्वाला या गुन्हेगारी कृत्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे अराघची यांनी रशिया आणि युरोपियन युनियनच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.

या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असताना इराणने तेहरानमधील युक्रेनच्या प्रभारी दूतांना पाचारण करुन औपचारिक आणि कडक निषेध नोंदवला. त्याचवेळी, युरेशियाचे महासंचालक मनूचेहर मोराडी यांनी हा हल्ला म्हणजे कॅस्पियन समुद्रातील देशांच्या सुरक्षेला थेट आव्हान आणि आक्रमकता असल्याचे म्हटले. या हल्ल्यासाठी युक्रेनला जबाबदार धरुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी इराणने (Iran) केली. तर दुसरीकडे, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियन लष्करी ठिकाणांवर लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे मान्य केले असले, तरी इराणने आता आपल्या नागरिकांचे आणि राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आक्रमक पाऊल उचलण्याची तयारी दर्शवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RCBच्या स्टार खेळाडूचा मोठा निर्णय! संघाला ठोकला रामराम; आता 'या' संघाकडून खेळताना दिसणार

Mormugao Municipality Waste Segregation Training: मुरगाव पालिका क्षेत्रातील शाळांमध्ये कचरा वर्गीकरणाचे चार टप्पे; प्रशिक्षण कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

Bicholim Food Court: डिचोलीतील 'फूड कोर्ट' अंधारात; दीड महिन्यापासून वीज दिवे बंद; व्यावसायिकांचा उदरनिर्वाह धोक्यात

Seattle Center Shooting: अमेरिकेतील सिएटलमध्ये फूड फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; दोन ठार, पाच जण जखमी Watch Video

Salcete No Development Zone: सासष्टीतील 1.02 कोटी चौमी जमीन 'ना विकास क्षेत्र' करण्याचा प्रस्ताव! 5 गावांचा समावेश, ३० दिवसांच्या आत सूचना व हरकती मागविण्यात आल्या

SCROLL FOR NEXT