UK Dainik Gomantak
ग्लोबल

UK: युनायटेड किंगडममध्ये जॉबची भन्नाट ऑफर, तुम्हीही म्हणाल 'जॉब असावा तर असा...!'

या अनोख्या नोकरीदरम्यान कर्मचाऱ्याला संपूर्ण ब्रिटनमध्ये गाडी चालवावी लागेल आणि बिअरचा आस्वाद घ्यावा लागेल. पण काही अटींचे पालन ही करावे लागेल.

Puja Bonkile

UK: जर एखाद्याने दिवसभर एसी कारमध्ये फिरून फुकटात बिअर पिऊन चांगले पॅकेज असणाऱ्या नोकरीचे स्वप्न पाहिले असेल, तर कदाचित त्याच्या स्वप्नांची नोकरी लंडनमध्ये त्याला मिळू शकते.

होय! कारण लंडनमधील एक मोठा व्यापारी समुदाय आपल्या कर्मचार्‍यांना देशभरात मुक्तपणे फिरण्यासाठी आणि मोफत बिअर पिण्यासाठी चांगले पॅकेज असलेली नोकरी देत आहे. या कामात कोणत्याही प्रकारचा धोका नाही, उलट कर्मचार्‍यांना मजा येईल. या नोकरीमध्ये कोणते काम करावे लागेल आणि कोणत्या अटी आहेत हे जाणून घेऊया.

'डेली स्टार'मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार ब्रिट स्टॉप्स नावाच्या कम्युनिटीने या अनोख्या नाकरीची संकल्पना काढली आहे. या कंपनीमध्ये पब, ब्रेवरीज आणि वाइनयार्डसह सुमारे 1100 छोटे बिझनेस आहेत. आता ब्रिट स्टॉप्स त्याचा पहिला पॉइंट चेझर शोधत आहे.

जगातील अशा प्रकारची ही पहिलीच नोकरी आहे, ज्यामध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्याला स्वत: मोटरव्हॅन किंवा कॅम्परव्हॅन चालवत फिरावे लागते. संपूर्ण देशात फिरून तुम्हाला फुकटात बीअर प्यायची आणि कंपनीला अपडेट्स द्याव्या लागतात. या कामासाठी ऑफिसला येण्याची गरज नाही. कंपनीच्या कोणत्याही ठिकाणी कार पार्क केल्यानंतर कर्मचारी घरी जाऊ शकतो.

  • कोणत्या अटींचे करावे लागेल पालन

  1. या नोकरीसाठी अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.

  2. त्याच्याकडे यूकेचे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स (DL) देखील असावा.

  3. अर्जदाराला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.

पॉइंट चेझर प्रवासादरम्यान विश्रांतीच्या वेळेत कंपनीच्या बेस्ट ड्रिंकचे मोफत आनंद घेऊ शकाल.पॉइंट चेजर एल्स आणि ग्रबच्या निवडीनंतर प्रत्येक ठिकाणी एक रात्र स्टॉप घेइल. म्हणजेच पॉइंट चेजरला एका ठिकाणी एका रात्रीसाठी थांबावे लागेल, कारण कंपनीने मद्यपान करून वाहन चालविण्यास मनाई केली आहे. म्हणजेच तो दारूच्या नशेत तर नाही ना याची तपासणी केल्यावरच त्याला पुढील स्थळी जाण्याची परवानगी दिली जाईल.

  • ब्रिट स्टॉप्सचे लाइफटाइम मेंबरशिप फ्री

रोजच्या ट्रिपनुसार कर्मचाऱ्याला पैसे मिळतील. याशिवाय ब्रिट स्टॉप्स लाइफटाइम मेंबरशिप फ्री देईल. ब्रिट्स स्टॉप कम्युनिटिमध्ये 750 हून अधिक पब समाविष्ट आहेत. या नोकरीत तुम्हाला शेकडो सुंदर आणि आल्हाददायक ठिकाणे बघायला मिळतील आणि चांगल्या ठिकाणी राहण्याची व्यवस्थाही असणार आहे. ही कम्युनिटि आपल्या कर्मचाऱ्यांचा सर्व खर्च स्वतः करणार आहे. यामुळे लोक ही नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT