Rishi Sunak Akshata Murthy Dainik Gomantak
ग्लोबल

रशियातील इन्फोसिसच्या उपस्थितीमुळे ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांना विचारण्यात आले खासगी प्रश्न

ब्रिटनचे भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक हे इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.

दैनिक गोमन्तक

लंडन: ब्रिटनचे अर्थमंत्री (UK Chancellor of the Exchequer) ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना भारतीय सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसच्या रशियामध्ये उपस्थितीबद्दल टीव्ही मुलाखतीदरम्यान खासगी प्रश्नांचा सामना करावा लागला, ज्यामध्ये त्यांची पत्नी अक्षता मूर्ती (Akshata Murthy) बद्दल देखील विचारण्यात आले होते. ब्रिटनचे भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक हे इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.

ब्रिटनने रशियावर (Russia) कठोर आर्थिक निर्बंध लादल्याच्या संदर्भात, ऋषी सुनक यांना ऑन एअर प्रश्न विचारण्यात आला की त्यांच्याच घरात नियमांचे पालन केले जात नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी ठणकावून सांगितले की ते खाजगी कंपन्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाहीत. ही कोणत्याही खाजगी कंपनीची वैयक्तिक बाब आहे.

ऋषी सुनक यांना इन्फोसिस आणि पत्नीच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले

एका टेलिव्हिजन (TV) मुलाखतीदरम्यान स्काय न्यूजच्या एका महिला पत्रकाराने ऋषी सुनक यांना विचारले की, “तुमचे रशियाशी कौटुंबिक संबंध आहेत, तुमच्या पत्नीची भारतीय सल्लागार कंपनी इन्फोसिसमध्ये भागीदारी असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कंपनी मॉस्कोमध्ये काम करते, त्यांचे तेथे कार्यालय आहे. इन्फोसिसचा मॉस्कोमधील अल्फा बँकेशी संबंध आहे. तुम्ही स्वतःच्या घरात इतरांना देत असलेल्या सल्ल्याचे पालन करत नाही का?

या प्रश्नाच्या उत्तरात ऋषी सुनक म्हणाले, “एक निवडून आलेला राजकारणी म्हणून मी कशासाठी जबाबदार आहे याविषयी मी मुलाखत देत आहे. या सगळ्यासाठी माझी पत्नी जबाबदार नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या राजवटीचा त्यांच्या कुटुंबाला "संभाव्य फायदा" होत आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, "मला तसे वाटत नाही आणि मी म्हटल्याप्रमाणे सर्व खाजगी कंपन्यांचे कामकाज त्यांच्यावर अवलंबून आहे."

ऋषी सुनक यांनी ब्रिटीश कंपन्यांसाठी सूचना जारी केल्या होत्या,

युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केल्यामुळे ब्रिटनने रशियन व्यवसाय आणि व्यक्तींवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले आहेत. ऋषी सुनक यांनी ब्रिटनमधील सर्व कंपन्यांना रशियातील कोणत्याही गुंतवणुकीचा खूप काळजीपूर्वक विचार करण्याचे निर्देश दिले होते. ते म्हणाले होते, “मी सर्व कंपन्यांना विनंती करतो की त्यांनी रशियातील त्यांच्या गुंतवणुकीबद्दल काळजीपूर्वक विचार करावा. रशियात गुंतवणूक करून ते पुतिन राजवटीला अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत. रशियाला जास्तीत जास्त आर्थिक नुकसान पोहोचवण्याच्या आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला रक्तपात थांबवण्याच्या आमच्या मिशनमध्ये आम्ही एकत्रितपणे पुढे जाणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT