UAE Demands 2 Billion Loan Back From Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

UAE Demands 2 Billion Loan Back From Pakistan: आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानसाठी संयुक्त अरब अमिरातीकडून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली.

Manish Jadhav

UAE Demands 2 Billion Loan Back From Pakistan: आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानसाठी संयुक्त अरब अमिरातीकडून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली असून यामुळे शेजारील देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती 'आसमान से गिरा और खजूर में अटका' अशी झाली. आधीच महागाई आणि रिकाम्या तिजोरीशी लढा देणाऱ्या पाकिस्तानला युएईने दिलेले 2 अब्ज डॉलर्सचे कर्ज तातडीने परत मागितले. मध्यपूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव पाहता, युएईने घेतलेला हा निर्णय पाकिस्तानसाठी एखाद्या आर्थिक त्सुनामीपेक्षा कमी नाही.

हे 2 अब्ज डॉलर्स पाकिस्तानच्या स्टेट बँकेत (SBP) 'सेफ डिपॉझिट' म्हणून ठेवण्यात आले होते, जेणेकरुन पाकिस्तानचा परकीय चलन साठा स्थिर राहू शकेल. आतापर्यंत युएई दरवर्षी या कर्जाची मुदत वाढवून देत असे, ज्यामुळे पाकिस्तानला तातडीने पैसे फेडण्याची गरज पडत नसे. मात्र, ताज्या अहवालांनुसार, आखाती देशांमधील युद्धासदृश परिस्थिती आणि बदललेली भू-राजकीय समीकरणे लक्षात घेऊन युएईने ही रक्कम या महिन्याच्या अखेरीस, म्हणजेच 17 एप्रिलपर्यंत परत देण्याचे आदेश दिले आहेत.

विशेष म्हणजे, या रकमेवर पाकिस्तानला 6 टक्के इतका मोठा व्याजदर मोजावा लागत होता. याआधी दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर आता युएईने तिसऱ्यांदा मुदत वाढवून देण्यास स्पष्ट नकार दिला.

पाकिस्तानला या चालू आर्थिक वर्षात एकूण 12 अब्ज डॉलर्सचे विदेशी कर्ज 'रोल-ओव्हर' करण्याची गरज होती, ज्यामध्ये सौदी अरबचे 5 अब्ज आणि चीनचे 4 अब्ज डॉलर्स सामील आहेत. सध्या पाकिस्तानकडे सुमारे 21 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा असला तरी, एकाच वेळी 2 अब्ज डॉलर्स बाहेर गेल्याने त्यांच्या तिजोरीवर मोठा ताण पडणार आहे. ही रक्कम दिल्यानंतर पाकिस्तानचा खजाना रिकामा होण्याच्या मार्गावर पोहोचू शकतो, ज्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) समोर हात पसरण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, युएईच्या या पावलामुळे पाकिस्तानची विश्वासार्हता धोक्यात आली. जर युएईप्रमाणेच सौदी अरब आणि चीननेही आपले पैसे परत मागितले, तर पाकिस्तान पूर्णपणे दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर उभा राहील. आता जगभराचे लक्ष शाहबाज शरीफ सरकारवर केंद्रित झाले आहे. पाकिस्तान या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी कोणत्या नवीन देशाकडे मदतीची याचना करतो किंवा देशातील परकीय चलन साठा वाचवण्यासाठी काय पावले उचलतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

एकूणच, आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीने पाकिस्तानच्या (Pakistan) आर्थिक अडचणींत भर घातली असून देशासमोर आता 'कंगाल' होण्याचे मोठे संकट उभे राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT