Parents Dainik Gomantak
ग्लोबल

मध्यपूर्वेत खाजगी कंपन्यांना पेरेंटल लीव देणारा UAE बनला पहिला देश

यूएईचे भारतातील राजदूत डॉ अहमद अल्बन्ना (Dr Ahmed Albanna) यांनी ही माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

संयुक्त अरब अमिराती (UAE) खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना आता पगारी पेरेंटल लीव देणार आहे. अर्थातच या काळात त्यांना पगारी सुट्ट्या देण्यात येणार आहेत. अशी सुविधा देणारा UAE हा मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका (MENA) मधील पहिला देश ठरला आहे. यूएईचे भारतातील राजदूत डॉ अहमद अल्बन्ना (Dr Ahmed Albanna) यांनी ही माहिती दिली आहे. 2020 मध्ये, UAE मध्ये महिला श्रमशक्तीचा सहभाग 57.5 टक्के होता, जो कोणत्याही MENA देशामध्ये सर्वाधिक आहे.

या देशांमध्ये जास्तीत जास्त प्रसूती रजा आणि पालकांची रजा

लिथुआनिया

हा युरोपियन देश आपल्या नागरिकांना मुलाच्या जन्मानंतर 156 आठवड्यांपर्यंत रजा घेण्याची परवानगी देतो. यात आईला 18 आठवड्यांची प्रसूती रजा मिळते.

हंगेरी

नव मातांना 24 आठवड्यांपर्यंत रजा मिळते, परंतु त्यांना मातृत्व लाभांसह 3 वर्षांपेक्षा (168 आठवडे) रजा देखील दिली जाते.

नॉर्वेजियन

नॉर्वेमधील पालक 12 महिन्यांपर्यंत रजेचा पर्याय निवडू शकतात. मातांना त्यांच्या गरोदरपणात सुमारे 12 आठवडे सुट्टी आणि प्रसूतीनंतर 6 आठवड्यांची रजा दिली जाते.

जर्मनी

जर्मनीमध्ये उदार पालकत्व प्रणाली आहे, जी पालकांना तीन वर्षांपर्यंतच्या रजेचा लाभ घेता येतो. जर्मनीमध्ये मातृत्व संरक्षण कालावधी देखील आहे.

एस्टोनिया

एस्टोनियामध्ये, नवजात बालक 70 दिवसांचे झाल्यानंतरच वडिलांना याचा लाभ घेता येतो. रजा घेणार्‍या पालकांना लाभ दिला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT