Typhoon Saola Dainik Gomantak
ग्लोबल

चीनमध्ये साओला चक्रीवादळाचा तडाखा, ग्वांगडोंग ते हाँगकाँगपर्यंत...

Typhoon Saola: साओला वादळामुळे चीनमध्ये प्रचंड हाहाकार उडाला आहे. दक्षिणेकडील प्रांत ग्वांगडोंगमध्ये प्रचंड वेगाने वाऱ्यासह वादळाचा तडाखा बसला आहे.

Manish Jadhav

Typhoon Saola: साओला वादळामुळे चीनमध्ये प्रचंड हाहाकार उडाला आहे. दक्षिणेकडील प्रांत ग्वांगडोंगमध्ये प्रचंड वेगाने वाऱ्यासह वादळाचा तडाखा बसला आहे. आजूबाजूच्या हाँगकाँग, शेन्झेन आणि मकाऊवर त्याचा वाईट परिणाम झाला आहे.

9 लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. अनेक भाग पाण्यात बुडाले आहेत. वीज आणि पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. हाँगकाँग आणि इतर प्रांतांमध्ये उड्डाणे रद्द करण्यात आली, शाळा बंद झाल्या आणि व्यवसाय ठप्प झाले आहेत.

दरम्यान, जमिनीवर येण्यापूर्वी वादळाचा वेग ताशी 200 किमी होता. ग्वांगडोंग आणि फुजियान प्रांतात सर्वाधिक विध्वंस झाला आहे. जमिनीवर येण्यापूर्वी वादळ कमकुवत झाले होते. हाँगकाँगमधील वादळाचा वेग चीनमध्ये (China) येण्यापूर्वी खूपच जास्त होता.

हाँगकाँगमध्ये, स्टॉर्म सिग्नल 10 वाजता ठेवण्यात आला होता, परंतु शनिवारी सकाळपर्यंत तो आठ पर्यंत कमी करण्यात आला होता. स्टॉर्म सिग्नल वाढल्याने वादळामुळे विध्वंस होण्याचा धोका वाढतो. हवामान खात्याने सांगितले की, शहरातील अनेक भाग पाण्यात बुडाले आहेत.

ग्वांगडोंगमध्ये प्रचंड विध्वंस अनेक भागात भूस्खलन

चीनच्या ग्वांगडोंग, शेन्झेन, मकाऊ आणि आसपासच्या प्रांतात अनेक घरे उद्ध्वस्त झाली. वेगवान वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली. हाँगकाँगच्या कॉजवे बे जिल्ह्यात अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.

मकाऊ, जगातील सर्वात मोठे जुगाराचे केंद्र आहे. या शहारातील कॅसिनो शुक्रवारी रात्री बंद झाल्यानंतर शनिवारी सकाळी 8 पासून पुन्हा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे स्थानिक सरकारने सांगितले.

दुसरीकडे, चीनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्वांगडोंगच्या झुहाई शहरात ताशी 160 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. येथील अनेक भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या.

ग्वांगडोंगच्या शेन्झेन शहरात झाड पडून वाहनाला धडकल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

चीनी रेल्वेकडून सांगण्यात आले की, ग्वांगडोंगमधील रेल्वे वाहतूक स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजल्यापासून हळूहळू पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. वादळाचा धोका असल्याने येथील रेल्वे वाहतूक काही काळापुरती बंद करण्यात आली होती.

आता तैवानला धोक्याची घंटा, मुसळधार पावसाचा अंदाज

शेन्झेनमधील स्थानिक मीडियाने वृत्त दिले आहे की, टायफून साओला प्रांतातून निघून गेले आहे. येथे वादळाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आता तो यलो अलर्ट करण्यात आला आहे.

दरम्यान, पाऊस आणि वादळाचा धोका जवळपास संपुष्टात आला आहे, पण लोकांना अजूनही घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आता तैवानला (Taiwan) वादळाचा धोका निर्माण झाला आहे. वादळाच्या धोक्यामुळे येथील काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

पुढील आठवड्यात येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथे लोकांना समुद्र किनारी आणि पर्वतीय भागांपासून दूर राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT