China Economic Crisis: सुपर पॉवर होण्याचे स्वप्न भंगणार! चीन अर्थव्यवस्थेला संकटांनी घेरले

China Economic Crisis: जगातिक महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहणारा चीन सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
China
ChinaDainik Gomantak
Published on
Updated on

China Economic Crisis: जगातिक महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहणारा चीन सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था अडचणीत आली तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून येईल.

दरम्यान, जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी आपले कारखाने चीनमध्ये उभारले आहेत. चिनी कारखान्यांमध्ये तयार होणारा माल जगभर पुरवला जातो. याशिवाय, चीन हा जगातील सर्वात मोठी उत्पादन अर्थव्यवस्था आणि वस्तूंची निर्यात करणारा देश आहे.

इतकेच नव्हे तर धातूंसह अनेक प्रमुख वस्तूंचा चीन जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे. चीन हा अनेक देशांसोबतचा प्रमुख द्विपक्षीय व्यापार भागीदार आहे. चीनच्या (China) अर्थव्यवस्थेत उलथापालथ झाली, तर जगही या प्रभावापासून वाचू शकणार नाही.

China
China Economic Growth Rate: चीनी अर्थव्यवस्थेला मोठा फटका, 50 वर्षांतील दुसऱ्या...!

चीनचे विकास मॉडेल कोसळले?

अमेरिकेतील एका प्रमुख दैनिकाने रविवारी आपल्या बातमीत दावा केला की, चीनची अर्थव्यवस्था आता गंभीर संकटात सापडली आहे. त्यांचे 40 वर्षांचे विकास मॉडेल कोलमडले आहे.

वॉल स्ट्रीट जर्नल (डब्ल्यूएसजी) च्या वृत्तानुसार, चीन आता अत्यंत संथ गतीन आर्थिक प्रगती करत आहे. अमेरिका आणि त्याच्या सहयोगी देशांसोबतचे वाढते अंतर यामुळे परकीय गुंतवणूक आणि व्यापार धोक्यात आल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलने कोलंबिया विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक आणि आर्थिक संकटांचे तज्ज्ञ अॅडम टोझे यांना उद्धृत केले की, "आम्ही आर्थिक इतिहासातील सर्वात नाट्यमय बदलाचे साक्षीदार आहोत."

China
Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानचे नशीबही फुटके, IMF ने पुन्हा दिला मोठा दणका; आता डिफॉल्ट होण्यापासून...

दुसरीकडे, अहवालात बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या डेटाचा हवाला देऊन असे म्हटले आहे की सरकारी आणि सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या कर्जाच्या विविध स्तरांसह एकूण कर्ज 2022 पर्यंत चीनच्या जीडीपीच्या (GDP) जवळपास 300 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती, 2012 मध्ये ते 200 टक्क्यांपेक्षा कमी होते.

तसेच, चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरो (NBS) ने जूनमध्ये म्हटले आहे की, 2023 च्या पहिल्या सहामाहीत (H1) चीनचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वार्षिक 5.5 टक्क्यांनी वाढले आहे. पहिल्या सहामाहीत चीनचा जीडीपी 59,300 अब्ज युआन होता.

China
Pakistan Economic Crisis: कर्जासाठी पाकिस्तान खोटं बोलला, IMF ने दिला मोठा दणका!

मात्र, चीनची अर्थव्यवस्था अडचणीत असताना यापूर्वी दोनदा असे घडले होते. 2008-09 च्या जागतिक आर्थिक संकटात आणि 2015 मध्ये चीनला अशाच प्रकारचे धक्के सहन करावे लागले होते, परंतु दोन्ही वेळा चीनने सर्व आशंका चुकीच्या असल्याचे सिद्ध केले आणि आपली अर्थव्यवस्था मजबूत झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com