Imran Khan and Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र

नवीन सरकारमधील मंत्री अहसान इक्बाल यांनी इम्रान खान यांच्यावर देशात अराजकता पसरवल्याचा आरोप केला आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान (Pakistan) मधील सत्ताधारी पक्षाने इम्रान खानला विविध विषयांवरून घेरले आहे. मात्र याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. खान यांच्या पक्षाने देशभरातील निवडणूक आयोगाच्या कार्यालयांसमोर आंदोलन करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांच्या आचरणाविरोधात मंगळवारी ही निदर्शने करण्यात येणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. (Tussle between ruling and opposition parties in Pakistan)

नवीन सरकारमधील मंत्री अहसान इक्बाल यांनी इम्रान खान यांच्यावर देशात अराजकता पसरवल्याचा आरोप केला आहे. आत्तापर्यंत इम्रान खान सध्याच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांवर विदेशी षडयंत्रात सहभागी असल्याचा आरोप करत आहेत. आता सत्ताधारी पक्षानेही त्यांच्यावर हा आरोप केला आहे.

दोन्ही पक्षांमधील वाढत्या गंभीर आरोप-प्रत्यारोपांमुळे देशातील राजकीय वातावरण अधिकाधिक गढूळ झाले आहे. हे लवकर थांबवले नाही तर सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्थेवर याचे भयंकर परिणाम होऊ शकतात, असे पाकिस्तान मधील लोकांचे मत आहे.

पीटीआयचे नेते चौधरी यांनी रविवारी सांगितले की, पीटीआयच्या राजकीय समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यालयांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त अप्रामाणिकपणे वागत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT