'किक', अफगाण महिला फुटबॉल संघांचा बोल्ड निर्णय, मैदानावर केली एन्ट्री

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) राष्ट्रीय महिला फुटबॉल संघाने तालिबान राजवटीतून बाहेर पडल्यानंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात खेळायला सुरुवात केली आहे.
Afghanistan's national women's football team
Afghanistan's national women's football teamDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय महिला फुटबॉल संघाने तालिबान राजवटीतून बाहेर पडल्यानंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात खेळायला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने बऱ्याच महिला खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांना अफगाणिस्तान (Afghanistan) सोडण्यास मदत केली होती. रविवार 24 एप्रिल रोजी, या अफगाण महिला खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला (Australia) पोहोचल्यानंतर प्रथमच स्थानिक लीग सामन्यात भाग घेतला. (Afghanistan's national women's football team has started playing in Australia for the first time)

Afghanistan's national women's football team
अफगाणिस्तान संघाला मिळाला नवा प्रशिक्षक

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील व्हिक्टोरिया प्रांतात झालेला हा सामना अनिर्णित राहिला, परंतु अफगाण महिलांनी मैदानात परतणे हा एक शक्तिशाली, प्रतीकात्मक विजय होता. या खेळाडूंना रोखण्यात तालिबानला यश आले नाही, हे या सामन्यातून दिसून आले, असे संघाची कर्णधार निलाब यांनी सांगितले. त्यांच्या टीममधील इतर सदस्यांप्रमाणे त्यांनी अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन आपले आडनाव उघड केले नाही.

तसेच, आमच्यावर देश सोडून जाण्याची वेळ आली. परंतु आम्ही अजूनही आमच्या देशाचा विचार करत आहोत," असे महिला खेळाडूंनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय महिला संघाच्या खेळाडूंचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे कौतुक केले. तालिबानी राजवट स्थापन झाल्यानंतर अफगाणिस्तानातून या महिला खेळाडूंना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात ऑस्ट्रेलियाने मदत केली. दुसरीकडे, सत्ता हातात घेतल्यानंतर तालिबानने (Taliban) महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली. मुलींच्या शिक्षणावर निर्बंध घालण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com