Turkiye Political Tension Dainik Gomantak
ग्लोबल

खासदारांनी एकमेकांचे कपडे फाडले अन् लाथाबुक्क्यांनी तुडवले, तुर्कीच्या संसदेत तूफान राडा; पण नक्की काय घडले? Video Viral

Turkiye Political Tension: तुर्कीच्या संसदेत बुधवारी (11 फेब्रुवारी) सत्तेचा आणि लोकशाहीचा एक विदारक चेहरा जगासमोर आला.

Manish Jadhav

Turkiye Parliament Brawl: तुर्कीच्या संसदेत बुधवारी (11 फेब्रुवारी) सत्तेचा आणि लोकशाहीचा एक विदारक चेहरा जगासमोर आला. राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन यांनी मंत्रिमंडळात केलेल्या मोठ्या फेरबदलामुळे संसद युद्धभूमी बनल्याचे पाहायला मिळाले. नव्या न्यायमंत्र्यांच्या नियुक्तीवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे खासदार एकमेकांशी भिडले असून त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. लाथा-बुक्क्यांचा वापर, एकमेकांना दिलेले धक्के आणि सुरक्षा रक्षकांची झालेली धावपळ यामुळे संसदेचे कामकाज काही काळासाठी ठप्प झाले.

या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी इस्तंबूलचे मुख्य सरकारी वकील अकिन गुरलेक यांची न्यायमंत्री म्हणून झालेली नियुक्ती आहे. जशी त्यांच्या शपथविधीची तयारी सुरु झाली, तसे विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या मध्यभागी येऊन निदर्शने सुरु केली. या निदर्शनांना सत्ताधारी बाकांवरील खासदारांनी विरोध केल्याने वादाची ठिणगी पडली. सुरुवातीला केवळ शाब्दिक चकमक आणि घोषणाबाजी सुरु होती, मात्र काही क्षणांतच त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. काही खासदार एकमेकांना लाथा-बुक्क्या मारताना दिसले. मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकांना मध्यस्थी करावी लागली, परंतु खासदारांमधील संताप इतका होता की त्यांना शांत करताना सुरक्षा दलाचीही मोठी दमछाक झाली.

तुर्कीमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पीपल्स पार्टीने (CHP) अकिन गुरलेक यांच्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला. गुरलेक यांनी मुख्य सरकारी वकील असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने खटले चालवल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र, एर्दोगन सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र असल्याचे म्हटले. या प्रचंड गदारोळातही गुरलेक यांनी न्यायमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच मुस्तफा सिफ्टसी यांनी नवीन गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.

तुर्कीमधील हे राजकीय नाट्य अशा वेळी घडले आहे जेव्हा देश आधीच गंभीर राजकीय तणावातून जात आहे. इस्तंबूलचे महापौर आणि एर्दोगन यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी एक्रेम इमामोग्लू यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांवर कायदेशीर कारवाई सुरु असल्याने वातावरण तापलेले आहे. संसदेत (Parliament) झालेला हा राडा तुर्कीच्या राजकारणातील वाढती कटुता आणि भविष्यातील संघर्षाचे संकेत देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

SCROLL FOR NEXT