Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

Trump Tariff: धोक्याची घंटा! ट्रम्प 'टॅरिफ' धोरणांमुळे जागतिक मंदी येण्याची 60 टक्के शक्यता; जेपी मॉर्गनचा इशारा

Tariff: अमेरिकेतील आघाडीची आर्थिक सेवा कंपनी जेपी मॉर्गनने एक गंभीर इशारा दिला आहे.

Sameer Amunekar

न्यूयॉर्क: आघाडीची आर्थिक सेवा कंपनी जेपी मॉर्गनने एक गंभीर इशारा दिला आहे. कंपनीच्या अंदाजानुसार, अमेरिकेची अर्थव्यवस्था २०२५ च्या अखेरीस मोठ्या आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडू शकते. या संभाव्य संकटामागे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची नवी टॅरिफ (शुल्क) धोरणे प्रमुख कारणीभूत ठरू शकतात, असे जेपी मॉर्गनचे म्हणणे आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला ट्रम्प प्रशासनाने देशांवर नव्या करांची (टॅरिफ) घोषणा करत आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात खळबळ उडवून दिली. या निर्णयानंतर चीननेही अमेरिकन वस्तूंवर कर लादून प्रत्युत्तर दिले.

या परस्पर टॅरिफ लादण्याच्या कारवाईमुळे अमेरिकेचा आणि चीनचा व्यापारी संघर्ष अधिक तीव्र झाला असून, या वाढत्या व्यापार युद्धामुळे जागतिक वित्तीय बाजारपेठांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जागतिक अर्थव्यवस्था २०२५ अखेर मंदीत जाण्याची शक्यता आता ६० टक्क्यांपर्यंत वाढली आहे, असा अंदाज आघाडीची वित्तीय सेवा कंपनी जेपी मॉर्गनने व्यक्त केला आहे. यापूर्वी ही शक्यता ४० टक्क्यांवर होती.

अमेरिकेच्या धोरणांना संपूर्ण वर्षभर जागतिक दृष्टिकोनातून सर्वात मोठा धोका मानले गेलं आहे. असे एका ब्रोकरेज फर्मने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या नोटमध्ये नमूद केले आहे. ब्रोकरेजच्या मते, अमेरिकेचे व्यापार धोरण अपेक्षेपेक्षा कमी व्यवसाय-हितकारक ठरले असून, यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात अनिश्चितता आणि अस्थिरता वाढली आहे. या धोरणांमुळे जागतिक आर्थिक प्रणालीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

एस अँड पी ग्लोबलने मार्च महिन्यात अमेरिकेत मंदी येण्याची "व्यक्तिगत" शक्यता २५ टक्क्यांवरून ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे.

गोल्डमन सॅक्सने देखील २ एप्रिलच्या टॅरिफ घोषणेनंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मूलभूत आधारावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मंदीची शक्यता २० टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढवली असून, मागील वर्षीच्या तुलनेत आर्थिक घटक कमकुवत असल्याचे सांगितलं आहे.

एचएसबीसीचे विश्लेषक म्हणाले, "आमच्या मते, इक्विटी मार्केट आधीच वर्षाच्या अखेरीस मंदी येण्याच्या सुमारे ४० टक्के शक्यतेचे मूल्य निर्धारण करत आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांनी संभाव्य मंदीचा धोका आधीच लक्षात घेत बाजारभाव ठरवले आहेत.

याशिवाय, बार्कलेज, बोफा ग्लोबल रिसर्च, डॉएच्च बँक, आरबीसी कॅपिटल मार्केट्स आणि यूबीएस ग्लोबल वेल्थ मॅनेजमेंट यांसारख्या इतर प्रमुख संशोधन संस्थांनीही इशारा दिला आहे की, जर डोनाल्ड ट्रम्प यांचे नविन टॅरिफ धोरण कायम राहिले, तर अमेरिकन अर्थव्यवस्था याच वर्षात मंदीच्या गर्तेत जाण्याची शक्यता अधिक आहे.

बार्कलेज आणि यूबीएस यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की, अमेरिकन अर्थव्यवस्था लवकरच आकुंचनाच्या (recession) टप्प्यात प्रवेश करू शकते. तसेच, इतर काही प्रमुख विश्लेषकांनी येत्या काळात अमेरिकेतील आर्थिक वाढ केवळ ०.१% ते १% दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

नोव्हेंबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर, व्यवसाय-अनुकूल धोरणांवरील अपेक्षांमुळे अमेरिकन शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. मात्र, जानेवारीत टॅरिफ धोरणांची घोषणा झाल्यापासून वॉल स्ट्रीटच्या मुख्य निर्देशांकांसाठी पुढील तीन महिने अत्यंत अस्थिर आणि निराशाजनक ठरले. या वर्षी आतापर्यंत बेंचमार्क S&P 500 निर्देशांक ८% पेक्षा अधिक घसरला आहे.

या आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, बार्कलेज, गोल्डमन सॅक्स, आरबीसी आणि कॅपिटल इकॉनॉमिक्स यांसारख्या प्रमुख ब्रोकरेज कंपन्यांनी अमेरिकन स्टॉकवरील आपले वर्षअखेरीचे मूल्यनिर्धारण उद्दिष्ट (target) कमी केले आहे.

कॅपिटल इकॉनॉमिक्सने सर्वात कमी अंदाज नोंदवत आपले लक्ष्य ५.५०० पर्यंत खाली आणले आहे. हा अंदाज सध्याच्या बाजार परिस्थितीचा विचार करता प्रमुख ब्रोकरेज संस्थांमध्ये सर्वात कमी आहे. RBC ने त्यानंतर आपले लक्ष्य ५.५०० निश्चित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT