Goa Accident: कळंगुटमध्ये मद्यपी पर्यटकाचा धुडगूस; '80-90' च्या वेगात रिव्हर्स येत पाच गाड्यांना धडक

Calangute Accident: एका मद्यधुंद पर्यटकाने भाड्याच्या गाडीवरील नियंत्रण गमावले आणि भरधाव वेगात रिव्हर्समध्ये गाडी चालवत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच वाहनांना जोरदार धडक दिली
Calangute Tourist Accident
Calangute Tourist Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: मद्यधुंद अवस्थेत एका पर्यटकाने पार्क केलेल्या गाड्यांना मध्यरात्री अचानक धडक दिल्याने कळंगुट येथील वातावरण बरंच तापलं आहे. सेंट अँथोनी चॅपलजवळ एका मद्यधुंद पर्यटकाने भाड्याच्या गाडीवरील नियंत्रण गमावले आणि भरधाव वेगात रिव्हर्समध्ये गाडी चालवत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच वाहनांना जोरदार धडक दिली, या धडकेमुळे पाचही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

एका स्थानिक वाहन चालकाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.४ एप्रिल) रात्री एका पर्यटकाने दारूच्या नशेत त्याच्या गाडीवरचे नियंत्रण गमावले. नेमक्या कोणत्या कारणामुळे माहिती नाही पण हा हा पर्यटक जवळपास ८०-९०च्या वेगाने रिव्हर्स घेत मागे आला आणि मागे उभ्या असलेल्या चार-पाच गाड्यांना धडक दिली.

Calangute Tourist Accident
Goa Accident: फळांची चोरी ठरली जीवघेणी; फातोर्ड्यातील फळबागेत अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

वाहन चालकाच्या माहितीनुसार बंद स्थितीत असलेली गाडी पुन्हा सुरु करून हा पर्यटक भरधाव वेगाने मागे आला होता. मागे येणाऱ्या गाडीत पर्यटक एकटाच होता मात्र तो अतिशय जास्ती प्रमाणात दारूच्या नशेत वावरत होता. स्थानिक वाहन चालक असेही सांगतो की, त्याने ही गाडी थांवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, गाडीवर हात मारत पर्यटकाला थांबण्याचा प्रयत्न देखील केला मात्र तो काही थांबला नाही.

सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत आणि हा पर्यटक देखील त्यांच्या ताब्यात आहे. हा पर्यटक नेमका कुठून आला असेल याबद्दल कोणालाही माहिती नाही पण त्याच्या भाषेवरून तो आंध्र प्रदेशमधील असल्याची शक्यता स्थानिक चालकाने व्यक्त केली. शुक्रवारी रात्री ८:१५च्या सुमारास झालेल्या या अपघातात स्थानिक वाहन चालक त्याच्या जीवाला देखील धोका निर्माण होता असं म्हणालाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com