Goa News: समुद्रकिनारी तसेच रस्त्याच्या कडेला स्वयंपाक करणाऱ्या पर्यटकांवर होणार कारवाई

CM Pramod Sawant: रस्त्याच्या कडेला थांबून जेवण करणाऱ्या पर्यटक बसगाड्यांवर दंड आकारला जाईल आणि बस थेट पोलिस ठाण्यात नेली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पणजी: गोव्यात प्रवेश करताना गॅस सिलिंडर आणि स्टोव्ह आणणाऱ्या पर्यटकांना सीमेवर अडवले जाईल आणि त्यांचे सामान जप्त केले जाईल. समुद्र किनाऱ्यावर किंवा रस्त्याच्या कडेला स्वयंपाक करून घाण करणाऱ्यांची उपकरणे जप्त करण्यात येतील आणि ती परत मिळणार नाहीत. दंड भरून गॅस आणि स्टोव्ह परत मिळेल असे काहीही होणार नाही. ते कायमस्वरूपी जप्त केले जातील. रस्त्याच्या कडेला बस थांबवून खाणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. त्यांनी एखादे सभागृह भाड्याने घेऊन खावे, असे त्यांनी सांगितले.

पर्यटकांनी गोव्यात गॅस सिलिंडर किंवा स्टोव्ह आणू नये. जर सार्वजनिक ठिकाणी स्वयंपाक करताना आढळले, तर त्यांना पोलिस ठाण्यात नेले जाईल. तसेच, रस्त्याच्या कडेला थांबून जेवण करणाऱ्या पर्यटक बसगाड्यांवर दंड आकारला जाईल आणि बस थेट पोलिस ठाण्यात नेली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Government Development Exhibition
home minister amit shah reviews goa st reservation file
Goa Cabinet Expansion Updates
Goa Traffic Fines
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com