Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानात जाणं अत्यंत धोकादायक, 'या' देशाने नागरिकांना केलं सतर्क; रेड लिस्टमध्ये टाकले

Traveling To Pakistan Is Very Dangerous: पाकिस्तानला धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. ब्रिटनने पाकिस्तानचाही आपल्या नागरिकांसाठी धोकादायक असलेल्या देशांच्या यादीत समावेश केला आहे.

Manish Jadhav

Traveling To Pakistan Is Very Dangerous: पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनलेल्या पाकिस्तानातून रोज दहशतवादी हल्ल्यांच्या बातम्या येतात. यातच आता, पाकिस्तानला धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. ब्रिटनने पाकिस्तानचाही आपल्या नागरिकांसाठी धोकादायक असलेल्या देशांच्या यादीत समावेश केला आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओ न्यूजनुसार, यूकेच्या फॉरेन कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिसने (FCDO) पाकिस्तानचाही प्रवासासाठी अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या देशांच्या यादीत समावेश केला आहे. आतापर्यंत FCDO ने एकूण 24 देशांवर बंदी घातली आहे.

दरम्यान, ब्रिटनमध्ये गुन्हेगारी, युद्ध, दहशतवाद, रोगराई, हवामान, नैसर्गिक आपत्ती आणि इतर आव्हाने लक्षात घेऊन ही यादी तयार केली जाते. पाकिस्तान व्यतिरिक्त, नुकत्याच ब्रिटनच्या या यादीत समाविष्ट असलेल्या देशांमध्ये रशिया, युक्रेन, इस्रायल, इराण, सुदान, लेबनॉन, बेलारुस आणि पॅलेस्टिनी प्रदेशांचा समावेश आहे. या सर्व भागात सध्या युद्धसदृश्य परिस्थिती आहे.

FCDO ने ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या देशांमध्ये अफगाणिस्तान, बुर्किना फासो, मध्य आफ्रिकन रिपब्लिक, चाड, हैती, इराक, इस्रायल, लेबनॉन, लिबिया, माली नायजर, उत्तर कोरिया, सोमालिया, सोमालीलँड, दक्षिण सुदान, सीरिया, व्हेनेझुएला आणि येमेन यांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांसाठी रेड लिस्ट जारी केली आहे. या यादीत पाकिस्तानचेही नाव आहे. ब्रिटनने आपल्या नागरिकांना अत्यंत आवश्यक असल्याशिवाय पाकिस्तानला जाऊ नये असे सांगितले आहे.

दुसरीकडे, 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये 1524 जीवघेणे हल्ले, 1463 जखमी आणि 789 दहशतवादी हल्ले झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 6 वर्षात पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले टॉपवर आहेत. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. 2023 मध्येच धार्मिक स्थळांवर झालेल्या हल्ल्यात किमान 203 जणांना जीव गमवावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: सुपरस्टार 'रोनाल्डो' खेळणार गोव्यात? चाहत्यांचे AFC लीगकडे लक्ष; FC Goa च्या गटात येण्याची आतुरता

Vote Chori: पत्ता नेपाळींचा, राहतात भलतेच! गोवा काँग्रेसची घराघरांत जाऊन पडताळणी; बोगस मतदारांची पोलखोल

Rashi Bhavishya 15 August 2025: कुटुंबात प्रेम वाढेल, आर्थिक स्थैर्य टिकवण्यावर भर द्या; महत्त्वाचे करार यशस्वी होतील

Independence Day Wishes in Marathi: बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो... स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' देशभक्तीभर शुभेच्छा

Betalbatim Beach: आधी जीवरक्षकाशी वाद घातला, पण त्याच 'जीवरक्षका'ने वाचवला जीव; बेताळभाटी किनाऱ्यावर पर्यटकाची बेफिकिरी!

SCROLL FOR NEXT