Pakistan Boat Capsized: पाकिस्तानात सिंधू नदीत बोट उलटल्याने 15 जण बुडाले, 4 बेपत्ता

Pakistan Boat Capsized: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खैबर पख्तुनख्वामध्ये गुरुवारी एक भीषण अपघात झाला.
Pakistan Boat Capsized
Pakistan Boat CapsizedDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Boat Capsized: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खैबर पख्तुनख्वामध्ये गुरुवारी एक भीषण अपघात झाला. सिंधू नदीत बोट उलटल्याने हा अपघात झाला. या बोट उलटून झालेल्या अपघातात 15 जण बुडाले. अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटानस्थळी पोहोचले. बचाव कार्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अपघात नौशेरा जिल्ह्यातील कुंद पार्क भागात घडला, जिथे मोठ्या संख्येने लोक ईद साजरी करण्यासाठी जमले होते.

लोकांचा शोध सुरु आहे

सिंधू नदीत झालेल्या बोट दुर्घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी 11 जणांना वाचवले असून बेपत्ता झालेल्या चार जणांचा शोध सुरु आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नौशेरा, स्वाबी आणि मर्दान येथील बचाव पथके शोध मोहिमेत भाग घेत आहेत. गोताखोर देखील पीडितांच्या शोधात व्यस्त आहेत.

Pakistan Boat Capsized
Pakistan Court: पाकिस्तान कोर्टाचा धक्कादायक निर्णय, आरोपीला दिली 80 फटके मारण्याची शिक्षा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बलुचिस्तानमध्ये रस्ते अपघात

यापूर्वी, पाकिस्तानातील सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातील सीमावर्ती शहराजवळ रस्ता अपघात झाला होता. यात्रेकरुंनी भरलेली बस खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला होता. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला असून 38 जण जखमी झाले होते. बलुचिस्तानमधील खुजदार जिल्ह्यातील दुर्गम मुस्लिम सूफी दर्गा शाह नुरानी येथे यात्रेकरु जात असताना बस खोल दरीत कोसळली होती.

Pakistan Boat Capsized
India Pakistan Tension: 'पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार करु', राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर चवताळला पाकिस्तान; म्हणाला...

मृतकांची ओळख पटली

एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळ्याचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी सांगितले होते. सर्व प्रवासी सिंध प्रांतातील थट्टा शहरातील रहिवासी होते. मृत आणि जखमींना कराची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मृतकांची ओळख पटली असून, त्यातील काहीजण एकाच कुटुंबातील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com