Pakistan Train | Pakistan Economic Crisis  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economy: अरे बापरे ! 'कंगाल' पाकिस्तानात ट्रेनचे भाडे तब्बल 10,000 रुपये, रेल्वे प्रवास महागला

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान दिवसेंदिवस कर्जात बुडत चालला आहे. आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकाटाचाही सामना पाकिस्तान सध्या करत आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान दिवसेंदिवस कर्जात बुडत चालला आहे. आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकाटाचाही सामना पाकिस्तान सध्या करत आहे. विजेचे दिवसेंदिवस वाढत चाललेले संकट आणि पेट्रोलचे वाढलेले दर याचा फटका बसत आहे.

आता वाढलेल्या रेल्वे भाड्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. रेल्वे प्रवास महाग झाला आहे. आता एका तिकिटाची किंमत 10,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वीज आणि पेट्रोलच्या गगनाला भिडलेल्या किमतींनंतर पाकिस्तानमध्ये रेल्वेचे भाडे किती वाढले आहे ते जाणून घ्या...

सध्या, पाकिस्तानची स्थिती चांगली नाही. पाकिस्तानी नागरिकांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत. मात्र, देशातील सरकार केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यात मग्न आहे.

तिजोरीत पैसे नसताना नुसते बोलून काहीच करता येत नाही. आता पाकिस्तानातील (Pakistan) लोकांनाही ही गोष्ट समजू लागली आहे. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानचे शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) सरकार प्रत्येक क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे.

विशेष ट्रेनच्या भाड्यात 25 टक्के वाढ झाली आहे

अलीकडेच, पाकिस्तानच्या विद्युत विभागाने विजेचे दर वाढवले ​​आहेत. आता पाकिस्तानच्या रेल्वे मंत्रालयाने देशातील विशेष ट्रेनच्या भाड्यात 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वस्त वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या चीनकडून पाकिस्तानने ट्रेन मागवली आहे.

तसेच, पाकिस्तानने गेल्या महिन्यातच 20 डिसेंबरपासून चीनमधून बनवलेल्या या ग्रीनलाइन एक्सप्रेस ट्रेनची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, आर्थिक अडचणींमुळे आता 27 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही ग्रीनलाइन एक्सप्रेस ट्रेन इस्लामाबाद ते कराची दरम्यान धावणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारने ग्रीन लाइन ट्रेनच्या भाड्यात 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात वाढ करुन पाकिस्तान सरकार प्रवाशांच्या खिशातून पैसे काढून आपली तिजोरी भरण्याचा डाव आखत आहे.

तिकिटाची कमाल किंमत 10,000 रुपये

ग्रीन लाइन एक्सप्रेस ट्रेनमध्ये 2 एसी पार्लर, 5 एसी बिझनेस, 6 एसी स्टँडर्ड आणि 4 ते 5 इकॉनॉमी क्लासचे डबे आहेत.

पाकिस्तान रेल्वेने रावळपिंडी ते कराची या ग्रीन लाइन ट्रेनचे इकॉनॉमी क्लास तिकीट 4000 रुपये केले आहे. त्याचवेळी, कराची ते रावळपिंडीचे एसी तिकीट 8000 रुपये करण्यात आले आहे, जी पाकिस्तानी प्रवाशांसाठी मोठी रक्कम आहे.

त्याचप्रमाणे, कराची ते रावळपिंडी हे बिजनेस क्लासचे भाडे 10,000 आणि लाहोर-कराची ते 9,500 पर्यंत वाढवण्यात आले आहे.

यापूर्वी, रेल्वेचे संबंधित अधिकारी ख्वाजा साद रफिक यांना लाहोर ते कराची या ग्रीन लाईनचा प्रवास वेळ 20 तासांपेक्षा कमी करण्याचे निर्देश देण्यात आले होते, ज्यामुळे राष्ट्रीय रेल्वेवरील प्रवाशांचा आत्मविश्वास पुनर्संचयित होईल.

पाकिस्तान 100 अब्ज डॉलर्सच्या कर्जात बुडाला आहे

सध्या पाकिस्तानवर 100 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे शेजारी देश चीन आणि सौदी अरेबियाकडे भीक मागत आहेत. मात्र, सौदी अरेबियाने 10 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले आहे.

पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा देखील फक्त $4 अब्ज आहे, जो सध्याच्या परिस्थितीचा विचार करता खूपच कमी आहे. अरबनेही अलीकडेच कोणत्याही देशाला बिनशर्त कर्ज देणार नसल्याचे जाहीर केले आहे. दावोसमध्ये सौदी अरेबियाच्या या ताज्या घोषणेने पाकिस्तानची झोप उडाली आहे.

20-25 दिवसांनी पगार मिळतो

रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांचे निश्चित वेतन आणि भत्तेही मिळत नाहीत. यासह, गेल्या वर्षभरात सेवानिवृत्त झालेल्या अनेक कर्मचार्‍यांवर ग्रॅच्युइटीच्या रुपात सुमारे 25 अब्ज रुपयांचे दायित्व शिल्लक आहे.

परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की, कर्मचाऱ्यांना 20-25 दिवसांनी पगार दिला जात असून, गेल्या महिन्याचा पगारही रखडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT