Pakistan Economy: आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानने गेल्या 6 महिन्यांत महागड्या कार, अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांचे सुटे भाग यासारख्या वस्तूंच्या आयातीवर $1.2 अब्ज (रु. 259 अब्ज) खर्च केले आहेत. असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.
पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा चार अब्ज डॉलरवर आला आहे, त्यामुळे केंद्रीय बँकेलाही जीवनावश्यक वस्तूंची आयात कमी करावी लागली आहे.
'द न्यूज'च्या अहवालात असे म्हटले आहे की, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाहने आणि इतर वस्तूंच्या आयातीत घट झाली असली तरी महागड्या आलिशान गाड्यांवर होणारा खर्च आणि अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंच्या खरेदीमुळे अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे. .
या सहा महिन्यांत, पाकिस्तानने $530.5 दशलक्ष (रु. 118.2 अब्ज) किमतीचे पूर्णपणे तयार केलेले युनिट्स (CBUs), डिससेम्बल्ड पार्ट्स (CKD/SKD) खरेदी केले.
वृत्तपत्रानुसार, आर्थिक संकट असतानाही, सध्याच्या सरकारने महागड्या कारच्या आयातीवरील बंदी उठवली आहे. डॉलर्समध्ये खर्च करण्याचे हे एक प्रमुख कारण बनले आहे.
सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सने सौदी डेव्हलपमेंट फंड (SDF) ला पाकिस्तानच्या (Pakistan) मध्यवर्ती बँकेतील ठेवींची रक्कम $ 5 अब्ज पर्यंत वाढवायची की नाही याचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. 2 डिसेंबर रोजी सौदी अरेबियाने 3 अब्ज डॉलर्सवरुन 5 अब्ज डॉलर्स देण्याची घोषणा केली होती.
तसेच, सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात संप्रेषण फ्रेमवर्क दरम्यान हे निर्देश आले आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियाचा (Saudi Arabia) दौरा पूर्ण केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.