Rose Montoya In White House Dainik Gomantak
ग्लोबल

Rose Montoya In White House: प्राइड मंथ सेलिब्रेशनमध्ये ट्रान्स-इंफ्लुएंसर बिडेन यांच्या समोर टॉपलेस; बिडेन म्हणाले, तुम्ही धाडसी आहात

Ashutosh Masgaunde

शनिवारी (10 जून, 2023) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस येथे समलैंगिकांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात एका TikTok सेलिब्रेटीने तिचा टॉप काढला.

यानंतर तिने कॅमेऱ्यासमोर तिचे प्रायव्हेट पार्ट उघडपणे दाखवायला सुरुवात केली. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेनही उपस्थित होते.

यावेळी बिडेन यांच्याबद्दल असा खुलासा झाला की तो अनेकदा नग्न पोहायला जातात, त्यामुळे महिलांना समस्यांना सामोरे जावे लागते.

ट्रान्सजेंडर टिकटोकरने व्हाईट हाऊसमध्ये काढला आपला टॉप

ट्रान्सजेंडर मॉडेल असलेल्या रोझ मोंटोयाने व्हाईट हाऊसमध्ये तिचा टॉप काढला आणि तिचे बुब्स दाखवणारा व्हिडिओ बनवला. हा सोहळा व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेला सर्वात मोठा 'प्राइड सेलिब्रेशन' म्हणून ओळखला जात आहे.

जून 2023 मध्ये जगभरातील ट्रान्सजेंडर 'प्राइड मंथ' साजरा करत आहेत. हे साजरे करण्यासाठी, जो बिडेनच्या प्रशासनाने या ट्रान्सजेंडर्सना व्हाईट हाऊसच्या साउथ लेनमध्ये आमंत्रित केले होते.

समारंभास मोठ्या संख्येने LGBTQ+ लोक उपस्थित होते. रोझ मोंटोयाने तिच्या TikTok हँडलवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. समलैंगिकांनी जो बिडेनसोबत सेल्फीही काढले.

यादरम्यान जो बिडेन यांनी 'हॅपी प्राइड मंथ, हॅपी प्राइड इयर, हॅपी प्राइड लाइफ' म्हणत त्यांना प्रोत्साहन दिले. ते म्हणाले की हे लोक सर्वात धाडसी आणि सर्वात प्रेरणादायी लोक आहेत.

सिएटल युनिव्हर्सिटीची पदवीधर रोझ मोंटोया दहावित असताना पुरुषांकडे आकर्षित होऊ लागली, नंतर उभयलिंगी ट्रान्सजेंडर बनली.

राष्ट्राध्यक्ष जो बिडेन नग्न पोहायला जातात

जुलै-ऑगस्ट 2014 मध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे आंघोळीचा सूट न घालता पोहायला जातात असे एका पुस्तकात उघड झाले. हे राष्ट्रपती होण्यापूर्वीचे आहे. त्या काळात ते अमेरिकेचे उपराष्ट्रपती होते आणि अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी दावा मांडत होते.

रोनाल्ड केसलर यांनी लिहिलेल्या 'द फर्स्ट फॅमिली डिटेल' या पुस्तकात असे सांगण्यात आले आहे की, जो बिडेन आपले सर्व कपडे काढून वॉशिंग्टन डीसीमधील उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी आणि डेलावेअरमधील त्यांच्या घरी पोहायला जायचे.

या पुस्तकात अनेक स्त्रोतांचा हवाला देऊन हे खुलासे केले गेले आहेत, ज्यांची नावे नमूद केलेली नाहीत. सीक्रेट सर्व्हिसच्या महिला कर्मचाऱ्यांना जो बिडेन नग्न पोहताना खूप त्रास व्हायचा. अनेकवेळा तो अचानक डेलावेअरला जाण्याचा बेत आखत असे, यामुळे एजंटही वैतागले होते.

बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांनी एजंटना आदराने वागवले, असेही त्यात लिहिले होते. तसेच, हिलरी क्लिंटन यांच्यावर, त्या एजंटांना खूप अवघड काम सांगायच्या असा आरोप होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT