Minor Boy Shoots Dead 3 People in Mall in Bangkok Dainik Gomantak
ग्लोबल

बँकॉकच्या लक्झरी मॉलमध्ये अल्पवयीन मुलाकडून अंदाधुंद फायरिंग, 4 जणांचा मृत्यू

Bangkok: बँकॉकमधील एका मोठ्या मॉलमध्ये मंगळवारी गोळीबार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

Manish Jadhav

Minor Boy Shoots Dead 3 People in Mall in Bangkok: थायलंडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बँकॉकमधील एका लक्झरी मॉलमध्ये मंगळवारी गोळीबार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, गोळीबाराच्या आरोपाखाली सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका 14 वर्षांच्या मुलाला अटक केली आहे. दरम्यान, थायलंडच्या पंतप्रधानांनी या घटनेवर शोक व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला पकडले

मीडिया रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर (Social Media) दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये पोलीस कर्मचार्‍यांनी मुलाला जमिनीवर झोपवले आहे. त्याला बेड्या घालण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, या घटनेनंतर बँकॉकच्या तपास यंत्रणांनी तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी पोस्ट शेअर केली

बँकॉकच्या मेट्रोपॉलिटन पोलिस डिटेक्टिव्ह विभागाने सियाम पॅरागॉन मॉलमधील आरोपीच्या अटकेबाबत फेसबुकवर अपडेट शेअर केल्याचे अहवालात म्हटले आहे.

याआधी, तिथल्या सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने आपल्या फेसबुक पेजवर खाकी कार्गो पॅंट आणि बेसबॉल कॅप घातलेल्या व्यक्तीचा अस्पष्ट फोटो पोस्ट केला होता.

पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये गोंधळाची दृश्ये दिसून आली. लहान मुलांसह लोक मॉलमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. दुसरीकडे, सुरक्षा रक्षकही त्यांना परिसर सोडण्यास मदत करत आहेत.

या घटनेवर चिंता व्यक्त करताना पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांनी सांगितले की, मला सियाम पॅरागॉन येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती आहे. मी पोलिसांना (Police) तपासाचे आदेश दिले आहेत. मला सार्वजनिक सुरक्षिततेची काळजी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT