Sheikh Hasina Dainik Gomantak
ग्लोबल

Protest Against Sheikh Hasina: 'या' मागणीसाठी हजारो बांग्लादेशी पंतप्रधान शेख हसिनांविरोधात उतरले रस्त्यावर

हजारो विरोधकांना सरकारने तुरूंगात डांबले; वीजकपात, इंधन दरवाढीमुळे असंतोष

Akshay Nirmale

Protest Against Sheikh Hasina: बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या विरोधात राजधानी ढाका येथे हजारो लोक रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत. विरोधी पक्षाने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या हजारो लोकांनी हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी करत निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बांग्लादेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांग्लादेश नॅशनॅलिस्ट पार्टी (BNP) ने पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करत एका रॅलीचे आयोजन केले होते. ढाकातील गोलापबाग येथे या रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत सहभागी झालेल्या नागरीकांना शेख हसिनांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘शेख हसिना मतचोर आहेत’ अशा घोषणा आंदोलक देत आहेत.

बांग्लादेश गेल्या काही काळात वीज कपात आणि वाढत्या इंधन दरांवरून असंतोष आहे. हाच मुद्दा घेत विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाविरोधात रान उठवायला सुरूवात केली आहे. अलीकडच्या काळात या सरकारविरोधी आंदोलनांना आणखी धार चढली आहे. त्यातूनच शुक्रवारी बांग्लादेशचे सैनिक चक्क BNP च्या मुख्यालयात घुसले. यात एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये असंतोष आहे.

या रॅलीत देशभरातून 2 लाख लोक सहभागी झाल्याचा दावा बीएनपीतर्फे करण्यात येत आहे. तर ढाका पोलिसांच्या मते, या रॅलीत 30 हजार लोक सहभागी झाले आहेत. बांग्लादेशात 2024 मध्ये सार्वजनिक निवडणूक होणार आहे. पंतप्रधान शेख हसिना वाजेद या 2009 मध्ये पंतप्रधान बनल्या आणि त्यानंतर 2024 मध्ये सलग पाचव्यांदा त्या पंतप्रधानपदाच्या दावेदार असणार आहेत.

बांग्लादेशी संसदेला ‘जातियो संगसद’ किंवा हाउस ऑफ द नेशन असे म्हटले जाते. यात एकुण 350 सदस्य निवडून येतात. यातील 50 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. सध्या संसदेत शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाकडे 302 खासदार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT