FIFA Viral Video: 'फिफा'मध्ये अमेरिकन पत्रकाराचा रहस्यमय मृत्यू; भावाने ढसाढसा रडत कतार सरकारवर केले गंभीर आरोप

फिफा विश्वचषक कव्हर करणार्‍या अमेरिकन पत्रकाराचा कतारमध्ये अल्पशा अटकेनंतर काही दिवसांनी मृत्यू झाला आहे.
US Journalist Death in FIFA
US Journalist Death in FIFADainik Gomantak
Published on
Updated on

फुटबॉल हा जगभरातील प्रसिद्ध आणि सगळ्यांचा आवडता क्रीडाप्रकार आहे. सध्या कतारमध्ये फिफा विश्वचषक सुरू आहे. यावेळी संपूर्ण जगभरातून फुटबॉल सामने पाहण्यासाठी लोक हजेरी लावत आहेत.

यादरम्यानची एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. फिफा विश्वचषक कव्हर करणार्‍या अमेरिकन पत्रकाराचा कतारमध्ये अल्पशा अटकेनंतर काही दिवसांनी मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या भावाने तो मारला गेला असल्याचे मत व्यक्त केल्याने सगळीकडे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. (US Journalist Death in FIFA)

अमेरिकन पत्रकार ग्रँट वाहल, देशातील सर्वात प्रसिद्ध सॉकर लेखकांपैकी एक आहे. अर्जेंटिना आणि नेदरलँड्स यांच्यातील फुटबॉल विश्वचषक सामन्याचे कव्हरेज करताना शनिवारी त्याचे निधन झाले. LGBTQच्या समर्थनार्थ इंद्रधनुष्य असलेला टीशर्ट परिधान केल्याबद्दल कतारमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

या घटनेनंतर ग्रँट वाहलने याबद्दल ट्विट केले. ट्विट केल्यामुळे त्याचा फोन काढून घेण्यात आल्याचेही त्याने सांगितले.

ग्रँटचा भाऊ एरिक याने आरोप केला आहे की त्याच्या मृत्यूमागे कतार सरकारचा हात असावा. ग्रँटच्या भावाने या संपूर्ण घटनेबद्दल नाराजी व्यक्त करत आपल्या भावाला न्याय मिळाला अशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्याने एक व्हिडिओ शेअर करत आपले मत व्यक्त केले आहे. तो काय म्हणतोय हे एकदा या व्हिडिओमध्ये पाहा :

सामना सुरू असताना अचानक ग्रँट खाली कोसळला असे त्याच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या अमेरिकन पत्रकाराने सांगितले. याबाबतची अधिक माहिती अशी की ग्रँट याने सोमवारी सांगितल्याप्रमाणे, तो कतारमधल्या एका हॉस्पिटलमध्ये गेला होता. तीन आठवड्यांची कमी झोप, जास्त ताण आणि भरपूर काम यामुळे त्याचे शरीर उत्तर देऊ लागले होते.

तो म्हणाला, 'गेल्या 10 दिवसांपासून जी सर्दी झाली होती ती यूएसए-नेदरलँड्स सामन्याच्या रात्री आणखी तीव्र झाली आणि मला माझ्या छातीच्या वरच्या भागात दबाव आणि अस्वस्थता जाणवू लागली. मला कोरोनाची लागण झाली नाही, कारण मी येथे नियमितपणे चाचणी करतो. परंतु मी आज मुख्य मीडिया सेंटरमधील वैद्यकीय क्लिनिकमध्ये गेलो आणि त्यांनी सांगितले की मला कदाचित ब्राँकायटिस झाले आहे. त्यांनी मला अॅंटीबायोटिक्स आणि काही हेवी-ड्युटी कफ सिरप दिले.'

ग्रँटचा भाऊ एरिक म्हणाला की, 'माझा भाऊ अतिशय निरोगी होता. तो असा अचानक हे जग कसे काय सोडू शकतो. त्याने मला सांगितले होते की त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यामुळे मला विश्वास आहे की त्याचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला मारले गेले आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com